Type to search

Breaking News maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

नाराज एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर

Share

मुंबई :  विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशनात  विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मंगळवारी विरोधकांपेक्षाही भाजपा नेते एकनाथ खडसे जास्त आक्रमक झाल्याचं चित्र पहायला मिळालं. प्रश्नोत्तराच्या तासात एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारसमोर एकामागोमाग एक अनेक मुद्दे उपस्थित करत घरचा आहेर दिला.

आदिवासी भागातील कुपोषणाचा मुद्दा उपस्थित करत एकनाथ खडसे यांनी मंत्र्यांना झापलं. युती सरकारच्या काळात कुपोषणाचे सर्वाधिक बळी गेल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी सौरपंपाचा विषयही काढला होता. विशेष म्हणजे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर उभे राहून सरकारविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या विरोधकांनी एकनाथ खडसेंचं मात्र स्वागत केलं.

भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी खडसे यांना जून २०१६ मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून खडसे हे मंत्रिमंडळाबाहेरच आहेत. सत्ता स्थापनेवेळी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सहभागी झाल्याने खडसेंना त्याची मोठी किंमत नंतरच्या काळात मोजावी लागली. मंत्रिमंडळात असताना झालेल्या विविध आरोपांतून त्यांना कालांतराने निर्दोषत्व मिळाले, मात्र खडसेंची मंत्रिमंडळात पुन्हा एकदा वर्णी लावण्याबाबत पक्षनेतृत्वाने नेहमीच संभ्रमावस्था कायम ठेवली.

खडसेंवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. योग्य वेळ आल्यावर त्यांना सन्मानाने परत घेतले जाईल. खडसेंचा मंत्रिमंडळातील समावेश हा न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे, असे सांगून भाजप पक्षश्रेष्ठींनी नेहमीच वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. वारंवार होणारी मानहानी लक्षात घेत जळगावमध्ये आयोजित भाजप मेळाव्यात खडसे यांनी मंत्रिमंडळात पुनरागमन करण्यास आपण स्वत: इच्छुक नसल्याचे जाहीर केले होते.

मधल्या काळात खडसेंना पुन्हा मंत्रिपद बहाल करण्याच्या हालचालींना वेग आला होता. त्यांना कोणते खाते दिले जाईल, याचा अंदाज समर्थक व्यक्त करू लागले होते. प्रत्यक्षात खडसेंना झुलवत ठेवण्यापलीकडे काहीच हालचाल झाली नाही. आताही नाराज खडसे यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या दृष्टीने पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून काही सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, संघटनात्मक पातळीवर असे बदल करण्याचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे भाजपच्या गोटातून सांगितले जाते

नाणार प्रकल्प रायगडमध्ये नेणार, मुख्यमंत्र्यांचं उत्तर

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित वादग्रस्त रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भात लेखीत उत्तर दिलंय.

सौदी अरेबियाची अराम्को, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या सहभागातून हा प्रकल्प उभारला जाणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात नाणार, सागवे, कात्रादेवी परिसरांत जगातील सर्वात मोठी रिफायनरी म्हणजे खनिज तेल शुद्धीकरणाचा तीन लाख कोटींचा हा भव्य प्रकल्प येऊ घातला होता.

ह्या प्रकल्पांसाठी १६००० एकर जमीन संपादित केली जाणार होती. पण नाणारमधून हटवून ही रिफायनरी आता रायगड जिल्ह्यात येणार आहे. विधिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. रायगडमध्ये प्रकल्प आणण्यास स्थानिकांचा विरोध नाही. ४० गावांमधील ग्रामस्थांचा भूसंपादनालाविरोध नाही, अस मुख्यमंत्री उत्तरात म्हटलं आहे.

प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्प आता अधिकृतपणे ‘रद्द’ झाला आशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीत लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. तसंच नाणारवासियांना हा प्रकल्प रद्द झाल्याच्या राजपत्राची लेखी प्रतच उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!