रेल्वे स्टेशन परिसरात युवकास मारहाण करुन लुटणार्‍या दोघांना अटक

0
जळगाव । दि. 19 । प्रतिनिधी-रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेलजवळ बसलेल्या सुभाष पाटील यांना मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी मारहाण करून त्याच्याजवळील सात हजार रुपये हिसकावून नेणार्‍या दोघांच्या शहर पोलिसांनी अवघ्या चार तास मुसक्या आवळल्या.

निवृत्ती नगरमधील रहिवाशी सुभाष सुकदेव पाटील काही कामानिमित्त रेल्वे स्टेशन परिसरात आले होते. यावेळी ते जवळच असलेल्या हॉटेल आकाशच्या ओटावर बसले होते.

यावेळी मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात युवकांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या खिश्यातील 7 हजार रुपयांची रोकड लांबवून नेल्याची घटना दि.18 रोजी रात्री घडली होती.

सुभाष पाटील यांनी तात्काळ शहर पोलिसात धाव घेवून घटनेची माहिती दिली. त्या अनुषंगाने शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या पथकातील सफौ. वासुदेव सोनवणे, संजय शेलार,विजय पाटील, गणेश शिरसाळे, अमोल विसपुते, मोहसीन बिराजदार यांनी तपासचक्रे फिरावून सुभाष पाटील यांनी सांगितलेल्या संशयितांच्या वर्णनावरून शिवाजीनगर येथील पुलाजवळून संदीप उर्फ डॉन मधुकर निकम वय 21, किरण अनिल बाविस्कर वय 22 रा. दोघे गेंदालाल मील या दोघांना काळया रंगाच्या एमएच 19 एसी 6378 क्रमांकाच्या पल्सरसह ताब्यात घेतले.

त्यांची कसुन चोैकशी केली असता, त्यांनी गुन्हाची कबुली दिली. त्यांच्याकडून 2 हजार 500 रुपये रोख व 40 हजारांची पल्सर जप्त करण्यात आली आहे.

या दोन्ही आरोपींना न्या. चौधरी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता, दोघांना दि.22 पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. निखील कुळकर्णी यांनी कामकाज पाहिले.

 

LEAVE A REPLY

*