Type to search

maharashtra आरोग्यदूत आरोग्यम धनसंपदा आवर्जून वाचाच जळगाव

# video # हॅप्पी योग स्ट्रिंट मध्ये जळगावकरांनी घेतला योगासह प्राणायमचा आनंद

Share

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, विश्वमंगल योग निसर्गोपचार केंद्र ,योग विदया गुरुकुलचा उपक्रम

जळगाव | आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमिवर आज . जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, विश्वमंगल योग निसर्गोपचार केंद्र व योग विदया गुरूकुल यांच्या सहकार्याने शहरात विविध ठिकाणी हॅप्पी स्ट्रीट योगाचे आयोजन करण्यात आले.

सकाळी 6 ते 7 स्वातंत्र्य चौक, 7 ते 8 महेश चौक, 8. 30 ते 9.30 ख्वाजामिया चौक , संध्याकाळी 6 ते 7 काव्यरतनावली चौक येथे आयोजन करण्यात आले .

या वेळेस विविध वयोगटातील महिला , पुरुषानी योग व प्राणायामाची प्रात्यक्षिके केले. या प्रसंगी विश्वमंगल योग च्या संचालिका सौ चित्रा महाजन, डॉ भावना चौधरी, सौ रुपाली ठाकूर सौ सीमा पाटील ,सौ कविता चौधरी यांनी नागरिकांकडून योग च्या काही आसनाचा अभ्यास करून घेतला व त्याचे महत्त्व विशद केले.

खेमचंद्र पाटील व निलाबरी जावळे, वृषाली चौधरी यांनी योग गीत म्हटले. विद्यार्थी व महिलांनी योग प्रात्यक्षिक करून दाखविले. या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सुनंदा पाटील यांनी देखील या प्रसंगी मार्गदर्शन केले .

महापौर सीमा भोळे यांनी उपस्थित राहून सर्वाना योगा चे महत्व सांगितले व सर्वाना योग करण्याचे आवाहन केले योग कार्यक्रमाला 21 जून पर्यंत विविध भागात योग व प्राणायाम शिकवले जाणार आहे. सर्व योग शिक्षक व साधक मोठ्या संख्येने उपस्थतीत होते

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!