मुक्ताईनगरला शिवसेनेतर्फे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा निषेध

0
मुक्ताईनगर :  भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अन्नदाता बळीराजा ला शेलक्या भाषेत शिव्या घालत मुक्ताफळे काढून बेफान बरळल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे दि ११ मे रोजी स. ११:३० वा . शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन प्रसंगी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सद्यास्थितित राज्यातला शेतकरी अनेक कारणांमुळे चिंताग्रस्त व अडचणींत असतांना सत्ताधारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे प्रकार करीत अत्यंत खालच्या स्तरातील शेलक्या भाषेत शेतकऱ्यांविषयी वक्तव्य करीत  मुक्ताफळे काढली .

तसेच या आधिही कर्ज मुक्ती दिल्यास आत्महत्या थांबतील असा लेखी प्रस्ताव द्यावा अशी एक ना अनेक बेछूट वादग्रस्त विधाने करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे हे कोणत्याही पदावर राहण्याच्या लायकीचे राहीलेले नाही .

त्यांचेवर बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी तसेस राज्यातील शेतकऱ्यांची जाहीर माफी दानवेनी मागावी व शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी अशी मागनी निवेदणात करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, तालुका प्रमुख छोटू भोई, सुनिल पाटील, निलेश बोराखेडे , पुरुषोत्तम खेवलकर , विठ्ठल तळेले, विकास राजपूत , बाळा भालशंकर, अफसर खान, साबीर शेख, गणेश टोंगे, प्रवीण चौधरी, चंद्रकांत सोनवणे, संदीप बघे, राजेंद्र हिवराळे, जना शेवाळे, वसंत भलभले, किरण कोळी, पप्पू मराठे, जितु पाटील आदिंसह असंख्य शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*