Type to search

जळगाव

जी.एच.रायसोनी अभियांत्रिकीला नॅकचे सर्वोत्कृष्ट “अ” मानांकन

Share

     शैक्षणिक वर्ष २०१९/२० मध्ये इन्स्टिट्यूट स्वायत्ततेसाठी प्रयत्न

जळगाव |  येथील जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटचा नुकताच विद्यापीठ अनुदान आयोगाचे स्वायत्त संस्थान राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषदेने निकाल जाहीर केला आहे. अखिल भारतीय विद्यापीठ आयोगातर्फे नवीन उच्च शिक्षण मुल्यांकन नियमानुसार द्वितीय सायकलमध्ये भारतातील एकूण महाविद्यालयांमध्ये समावेश होता. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयात जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंटला सर्वाधिक ४ पैकी ३.२३ गुण मिळाले आहेत. तसेच अभियांत्रिकीमहाविद्यालयीन गटात उत्तर महाराष्ट्र विभागातून प्रथम स्थानावर महाविद्यालयाने आपला झेंडा रोवला आहे.

 नुकत्याच झालेल्या नवीन मूल्यांकनात कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी सल्लग्नित जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटला राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषदेने एकूण सीजीपीए ४ पैकी ३.२३ असे गुण देत “अ” मानांकन दिले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची नवीन नॅक पद्धतीत मोठ्या प्रमाणावर बदल झालेले असून झालेले बदल पूर्णता विद्यार्थी हिताचे आहेत.

त्यामुळे झालेले बदल स्वीकारून नवीन पद्धतीचे मुल्यांकन करून महाविद्यालयाने हे यश मिळविले आहे. तसेच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या या पद्धतीला सामोरे जात उत्तर महाराष्ट्रातील अभियांत्रिकी गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

  रायसोनी इन्स्टिट्यूट शिक्षण क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. २००७ साली जळगाव शहरात सुरुवात झालेल्या रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने अतिशय मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक क्षेत्रात आगेकूच केली आहे. जळगाव शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाने अग्रस्थान मिळवून संस्थेचे नाव देश पातळीवर नेऊन ठेवले आहे. चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाला फक्त ११ वर्ष पूर्ण होत आहेत.

शिक्षण क्षेत्रात नाविन्यता आणि काळानुसार झालेले बदल स्विकारून विद्यार्थ्यांचे हित जोपासत संस्थेची वाटचाल आहे. संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाच्या वतीने नेहमी सक्रियतेने सकारात्मक निर्णय घेतले जातात. तसेच संस्थेचे आर्थिक पाठबळ देखील महत्वाचे असते. वेळोवेळी संस्थेचे चेअरमन .सुनील रायसोनी व कार्यकारी संचालक  प्रितम रायसोनी यांचे मार्गदर्शन मिळते त्यामुळे हे यश मिळाले.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेऊन महाविद्यालय कार्यरत राहील असा विश्वास डॉ.ए.जी.मॅथ्यु एक प्राचार्य या नात्याने मी देऊ शकतो. राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषदेने दिलेल्या “अ” श्रेणी मुळे आम्हाला अधिक चांगले बदल करून चांगले विद्यार्थी घडविता येतील. महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांच्या मेहनतीला यश मिळाल्यामुळे त्यांचे देखील अभिनंदन प्राचार्य डॉ.ए.जी.मॅथ्युयांनी केले.

   यावेळी संस्थेचे चेअरमन .सुनील रायसोनी, रायसोनी इन्स्टिट्यूटशन्सचे कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचा-यांचे विशेष कौतुक करून अभिनंदनही केले. प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!