भुसावळला गावठी कट्यासह आरोपीला अटक

0
भुसावळ |  प्रतिनिधी  : शहरातील वाल्मिक नगरातील युवकास गावठी कट्ट्यासह  बाजारपेठ पोलिसांनी अटक केली.

शहरातील वाल्मिक नगरातील रहिवाशी आकाश रायसिंग पंडीत (वय २४)याने मागील एका वादात आपल्या जवळील कट्टा बाहेर काढल्याच्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस अधीक्षक निलोत्पल व पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करुन आरोपीस वाल्मिक नगरातील आखाडा भागातून ताब्यात घेवून विचारपुस केली असता आखाडा भागातून त्याने कट्टा काढून दिला.

ही कारवाई  एपीआय मनोज पवार, पीएसआय मनोज ठाकरे, डीबीचे हे.कॉं.श्रीकांत जोशी, हे.कॉं. युवराज नागरुत, बंटी सैंदाणे, सुनील थोरात, दीपक जाधव, नीलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, संजय भदाणे, कृष्णा देशमुख यांनी केली.

याबाबत पो.कॉं. राहुल चौधरी यांच्या फिर्यादिवरुन बाजरपेठ पोलिसात गु.र.नं. ३१४५/१७, आर्म ऍक्ट ३/२५ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास हे.कॉ. युवराज नागरुत करीत आहेत.

LEAVE A REPLY

*