Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

# Video # तुका म्हणे सोपी केली पायवाट : भक्तीरसात तल्लीन होत बुलढाणा घाट केला सर

Share

मुक्ताईनगरच्या श्री मुक्ताई मंदिर देवस्थानाचे पुजारी उध्दव महाराज जुनारे थेट बुलढाण्याहून :

मुक्ताईनगर …होतो जयजयकार गर्जत अंबर !
मातले वैष्णव वीर रे !!
तुका म्हणे सोपी केली पायवाट!
तरावया भवसागर रे!!
नाचत पंढरीसी जावू रे खेळीया! विठ्ठल रूखमाई पाहू रे!!

अशाप्रकारचे भारूड गात गात सहजरीत्या भक्तीरसात चिंब होवून बुलढाणा घाट पार करित पालखी सोहळा बुलढाण्यात जुने शहरातील हनुमान मंदिर येथे दाखल झाला.

तत्पूर्वी पहाटे मोताळा शहरवासीयांना जड अंतःकरणी निरोप घेतला वाघजाळ फाटा मुर्ती गावी थोडा विसावा घेत पहाटे च्या भजनात पालखी सोहळा राजुर गावी पोहचला. समस्त गावकरी मंडळी राजुर तर्फे द्वादशी पारणे व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी 1वा सोहळा मार्गस्थ झाला. अवघड घाट चढून जायचे असल्याने भगवंताचे मनोमनी स्मरण करित मुक्ताबाई मुक्ताबाई जयघोषात व भारूडाचे तालात नाचत खेळत तुका म्हणे सोपी केली पायवाट या भावनेने झपाझप पावले टाकत शिखरावरील हनुमान मंदिर गाठले . तेथे थंडगार शरबत व भजनाचा आनंद घेतला.

मा.नगराध्यक्ष संजय गायकवाड यांनी स्वागत केले महिलांनी वारकरीना औक्षण केले . मिरवणूकने जुने शहरात हनुमान मंदिर येथे विसावला.

शनिवारी येळगाव मुक्काम

उद्या सकाळी कारंजा चौक बाजार रोड ,सराफ बाजार, सहकारी बॅक चौक ,पोलीस अधीक्षक कार्यालय,चैतन्यवाडी मार्गाने रामनगर येथे सकाळ चा विसावा होईल तेथून चिखली रोडवरील येळगाव मुक्काम राहणार आहे.तरी बुलढाणा शहरवासीयांनी आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखी दर्शन लाभ घेण्याचे आवाहन बुलढाणा शहर वारकरी संप्रदाय मंडळ व उमाकांत कुळकर्णी यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!