जळगावला पाऊसधारा

0
जळगाव| प्रतिनिधी : गेल्या महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने आज सकाळपासून शहरासह जिल्ह्यात हजेरी लावली.

मध्यम स्वरूपातील पडणार्‍या पावसामुळे पीकांना काही प्रमाणात जीवदान मिळणार आहे. मात्र दिवसभराचे पावसाळी वातावरण आरोग्यास घातक ठरत आहे. यामुळे डोकेदुखी,सांधे दुखी, दमा, संधीवात, आमवात यासारख्या रूग्णांच्या त्रासात वाढ झाली आहे.

जोरदार पावसाची प्रतिक्षाच

रिमझिम पावसाऐवजी मुसळधार पावसाची गरज आहे. यामुळेच जिल्ह्यातील नद्यानाले, ओढे वाहून निघतील. तर धरणेही भरतील. सध्यस्थितीत धरणांतील पाणी साठा अल्प आहे. मुसळधार पाऊस आल्यास किमान वर्षभर पुरेल एवढा तरी जलसाठा होण्यासह भूगर्भातील जलसाठ्यात वाढ होईल.

४८ तासात मुसळधार चा अंदाज

दरम्यान वेध शाळेने येत्या ४८ तासात मुसळधार पाऊस येण्याचा अंदाज वर्तविला आहे. सद्य स्थितीत इगतपुरी येथे जोरदार पाऊस पडत असून उत्तर महाराष्ट्रात पावसाळी वातावरण दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

*