नारायण राणेचा भाजपाशी घरोबा : केंद्रात मिळवणार मंत्रीपद

0
मुंबई | कॉंग्रेसचे नेते नारायण राणे हे येत्या २७ ऑगस्टला कॉंग्रेेसला सोडचिठ्ठी देणार आहेत. कॉंग्रेसला सोडतांनाच ते भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय पटलात होत आहे.

यास विद्यमान महसुल मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनीही तत्वत : दुजोरा देत नारायण राणे भाजपात आले तर स्वागतच असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राणेंचा भाजपात प्रवेश निश्चीत मानला जात आहे.

पुत्र नितेश व निलेश यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने आणि कॉंग्रेसमध्ये त्यांना मिळत असलेली वागणुक पाहता राणे यांनी हे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवीली जात आहे.

LEAVE A REPLY

*