मद्यधुंद अभियंत्याची महापौरांना अरेरावी

0
जळगाव । दि.18 । प्रतिनिधी-मनपाच्या बांधकाम विभागातून आरोग्य विभागात बदली केल्याच्या कारणावरुन संताप व्यक्त करत कनिष्ट अभियंता जितेंद्र यादव यांनी महापौरांच्या दालनात जावून महापौर नितीन लढ्ढा यांच्याशी उर्मटपणे अरेरावी केली.
दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत असभ्य वर्तन केल्यामुळे यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, असे पत्र महापौरांनी प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना दिले.

महानगरपालिकेच्या 17 व्या मजल्यावर महापौर नितीन लढ्ढा आपल्या दालनात बदले होते. स्थायी समितीची सभा संपल्यानंतर नगरसेवक नितीन बरडे, अनंत जोशी, संदेश भोईटे, चेतन शिरसाळे हे देखील त्याठिकाणी आले होते.

महापौर आणि नगरसेवकांची चर्चा सुरु असतांनाच कनिष्ट अभियंता जितेंद्र यादव महापौरांच्या दालनात आले. यादव यांची बांधकाम विभागातून आरोग्य विभागात बदली करण्यात आली आहे.

बदलीच्या कारणावरुन संतप्त झालेले यादव यांनी महापौरांना उद्देशून माझ्या बदलीस तुम्ही जबाबदार आहात! तुमचे काय म्हणणे आहे? अशा शब्दात असभ्य वर्तन करत अरेरावी केली.

यावर महापौरांनी तुम्ही बदली प्रशासनाने केली आहे. त्यामुळे आयुक्तांकडे तक्रार करा असे सांगितले. दरम्यान वाद वाढत असतांनाच बंटी जोशी यांनी मध्यस्थी करत यादव यांना शब्द व्यवस्थीत वापरण्याची विनंती केली.

मात्र यादव यांनी बंटी जोशी यांनाही तुम्ही मध्ये बोलू नका असे सुनावले. त्यामुळे बंटी जोशी, नितीन बरडे, संदेश भोईटे, चेतन शिरसाळे यांनी कर्मचार्‍याला सांगून यादव यांना बाहेर काढण्याची सूचना दिली.

त्यामुळे पुन्हा यादव यांनी महापौरांसह उपस्थित नगरसेवकांशी अरेरावी केली. त्यामुळे काहीवेळ गोंधळ निर्माण झाला होता.

 

 

LEAVE A REPLY

*