जळगावात विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न

0
जळगाव । दि. 18 । प्रतिनिधी-जळगावात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला आकाशवाणी चौकातून रिक्षेत बसवून रिक्षाचालकासह दोन प्रवाश्यांनी रिक्षेतच मारहाण केली.
त्यांच्या जवळील मोबाईल व पैसे हिसकावून रिक्षा पांडे डेअरी चौकातील राधाकृष्ण मंगलाकडे नेवून चालत्या रिक्षेतून उतरवून देत विद्यार्थ्याला ढकलून देण्याचा प्रयत्न केला गेला. ही घटना आज दुपारी 3.10 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत प्रत्यक्ष विद्यार्थ्यांने दिलेली माहिती अशी की, विवेक राजेंद्र पाटील रा. सावखेडा या विद्यार्थ्यांने भगीरथ आयटीआय कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतली असून तो दुपारी 2 वाजेच्या सुमारास कॉलेजवरून रिक्षाने आकाशवाणी चौकात आला.

त्या ठिकाणी त्याने दुसर्‍या एका रिक्षेला हात देवून फुले मार्केटमध्ये जायचे असे सांगितले. रिक्षावाल्याने रिक्षा थांबविली. यावेळी रिक्षेत एक अन्य प्रवासी बसला होता. विवेक रिक्षेत बसल्यानंतर काही अंतरावर पुन्हा दोन प्रवासी रिक्षेत बसले.

रिक्षा सुरु झाल्यानंतर मागे बसलेल्या तिन्ही प्रवाश्यांनी विवेकला रिक्षेतच मारहाण करून त्याच्या तोंडाला रुमाल बांधून त्याच्या जवळील 800 रुपये किंमतीचा मोबाईल व त्यांच्या पाकीटातील 180 रुपये काढून घेतले.

त्यानंतर रिक्षा पांडे चौकातील राधाकृष्ण मंगल कार्यालयाकडे नेवून चालत्या रिक्षेतून विवेक याला उतरवून देत ढकलण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर रिक्षाचालकासह प्रवाश्यांनी त्या ठिकाणावरून पळ काढल्या. घाबरलेल्या व मानसिक दबावात असलेल्या विवेकने जिल्हापेठ पोलिसात येवून आपबिती कथन केली.

त्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून त्याला सोबत नेत घटनेची माहिती जाणून घेतली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात विवेक पाटील याच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुध्द गुरन 99/17 भादवी कलम 392 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि संदिप आराक करीत आहे.

 

 

LEAVE A REPLY

*