सात संशयितांना न्यायालयीन कोठडी

0
जळगाव । दि. 18 । प्रतिनिधी-यावल तालुक्यातील नावरे येथील युवकास पिंप्राळा हुडको येथे घरी बोलावून दिड लाखाची मागणी करीत डांबून ठेवून त्याच्या जवळील दोन हजार रुपये लुटून नेल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे.
दरम्यान या संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, संशयितांना पोलिस कोठडीचे हक्क राखून दि.22 पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
यावल तालुक्यातील नावरे येथील निलेश पाटील या युवकास शारदा नामक महिलेन घरी नेवून त्यांच्याकडून दिड लाखाची मागणी करून मारहाण करीत डांबून ठेवून खिश्यातील दोन हजार रुपये काढून घेतले होते.

त्याचबरोबरच महिलेच्या सोबतच्या युवकांनी निलेशला 4-5 युवकांनी मारहाण करून त्यांच्या गळयातील सोन्याची चैन व अंगठया हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

निलेशला दोन तास डांबून ठेवण्यात आल्यानंतर निलेशने स्वताहुन त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली होती. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत निलेश पाटील यांनी रामानंद नगर पोलिसात धाव घेवून घटनेची आपबिती पोलिसांसमोर कथन केली.

त्यानंतर निलेशच्या फिर्यादीवरून शारदा नामक महिलेसह 3 महिला व 4 तरुणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासचक्रे फिरावून शारदा मोरे वय 26, वंदन मोरे वय 27, काजल तायडे वय 23 यांच्यासह पवन विजयसिंग बागडे वय 27, मोहम्मद शहीद सलीम वय 32, अर्जून विजयसिंग बागडे वय 28 या सहा जणांना पोलिसांनी रात्रीच अटक केली होती.

त्यानंतर पोलिसांनी आकाश दहीयेकर रा. जाखनी नगर याला अटक केली. दुपारी सात संशयित आरोपींना न्या. के.एस.कुळकर्णी न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडीचे हक्क राखून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. हेमंत मेंडकी यांनी कामकाज पाहिले.

 

LEAVE A REPLY

*