Type to search

maharashtra जळगाव

खानापूर ते पंढरपुर वारीचे चिनावल, फैजपूर येथे हरीनाम गजरात स्वागत

Share

चिनावल, ता. रावेर, । वार्ताहर :  वै. डिगंबर महाराज चिनावलकर यांच्या प्रेरणेने 35 वर्षापासून खानापूर तालुका रावेर येथून आषाढी वारीसाठी दरसाली निघणार्‍या या वर्षाच्या पायी दिंडीचे दि. 12 रोजी चिनावल येथे आगमन होताच टाळ मृदंग व हरिनामाच्या गजरात चिनावलकर यांनी मोठ्या उत्साहात दिंडीचे स्वागत केले. आज चिनावल येथे दिंडीचा मुक्काम ह भ प लीलाधर रेवाजी कोल्हे व नवयुवक मित्र मंडळ चिचवाडा यांचे कडे आहे .

आज सकाळी खानापूर येथून वारकर्‍यांचा समवेत टाळ-मृदंगाच्या व पावले खेळत दिंडी चिनावल येथे पोहोचली. गेल्या 35 वर्षांपासून वैकुंठवासी अरुण महाराज बोरखेडे कर यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी सुरू होती. मात्र त्यांचे नुकतेच देहावसान झाल्याने या दिंडीचे नेतृत्व शिर्डी येथील दुर्गादास महाराज नेहेते हे करीत आहे.

यंदा प्रथमच त्यांच्या नेतृत्वात दिंडी दि.5 जुलै रोजी पंढरपूर येथील वैकुंठवासी डिगंबर महाराज वारकरी सांप्रदायिक शिक्षण समिती च्या भव्य मठात मुक्काम पोहोचणार आहे. उद्या दि. 13 जून रोजी सकाळी येथून पुढील हंबर्डे येथील मुक्कामासाठी रवाना होणार आहे.

दरम्यान चिनावल मुक्कामी दुर्गादास महाराज नेते यांचे कीर्तन झाले. सदर पायी वारी मध्ये वारकर्‍यांनी मोठ्या संख्येने हजर व्हावे असे आवाहन वैकुंठवासी डिगंबर महाराज वारकरी संप्रदाय शिक्षण प्रसारक समिती रावेर यावल तालुका चिनावल व पंढरपूर स्थित मठातर्फे करण्यात आले आहे .

दिंडी सोहळ्याचे 36 वे वर्ष

दिंडी सोहळा सुमारे 36 वे वर्षा पासून अखंड सुरू आहे. या सोहळ्याला वै. डिगंबर महाराज चिनवलकर व अरुण महाराज बोरखेडेकर यांनी यापूर्वी संपूर्ण आयुष्य खर्ची घालून दिंडी परंपरा कायम जोपासना केली आहे. दिंडी चिनावलं, हंबर्डी, भुसावळ, खडके, जामनेर, सिलोड,जालना, बीड ,बार्शी, मार्गे पंढरपूरला पोहचून तेथे दिगंबर महाराज मठात दिंडीचा मुक्काम राहील. याकाळात जाताना दररोज कीर्तन भंजन या माध्यमातून व्यसनमुक्ती कार्यक्रम, स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

दिंडी मध्ये खानापूर पाडले, चिनवल, रोझोदा, खिरोदा, कळमोदा, बोरखेडा, फैजपूर, हंबर्डी, आमोदा येथील भाविक सहभागी झाले आहे . दिंडी चे करिता अध्यक्ष नरेन्द्र नारखेडे , उपाध्यक्ष घनश्याम पाटील, विठ्ठल भंगाळे, किशोर बोरोले, विजय महाजन, टेनू फेगडे , पांडुरंग पाटील, मुकेश पाटील, भास्कर बोंडे, खानापूर ग्रामस्थ, चिनावल ग्रामस्थ , बोरखेडा ग्रामस्थ व ट्रस्ट मंडळ यांचे सहकार्य लाभले आहे व झेंडूजी महाराज बेळीकर व जगन्नाथ महाराज अंजळे कर यांचे आशीर्वाद मिळत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!