Type to search

जळगाव

चराचर सृष्टीचा आधार म्हणजे पाणी : शास्त्री भक्तीस्वरूपदास

Share

फैजपूर, ता. यावल, । वार्ताहर :  चराचर सृष्टीचा आधार म्हणजे पाणी आहे. समस्त सजीवांमध्ये नवचैत्यन्य आणण्याचे काम पाणी करत असते. त्यामुळे अशा पाण्याची साठवणूक व जपवणूक करणे काळाची गरज आहे. असे मत शास्त्री भक्तीदासस्वरूप यांनी व्यक्त केले.

एक थेंब अमृताचा लोकसहभागातून जलसमृद्धी जलक्रांती अभियान हे स्वच्छ मन आणि पवित्र कर्तृत्व भावनेतून लोकसहभागातुन यशस्वी करावे असे आवाहन करत शास्त्रींजींनी विठ्ठलाकडे शेतकर्‍यांच्या शेतीसाठी पाण्याचे दान भजनातून मागीतले. ते म्हणतात नको पांडूरंगा मला सोन्या – चांदीचे दान रे.. फक्त भिजव पांडूरंगा हे तहानलेले रान रे..कमरेवरचा हात सोडुन आभाळाला लाव तू ढगाला थोडे हलवून भिजव माझा गाव तु .. मोह नको, अहंकार नको, नको कपडे छान, दर वर्षी भरभरून पिकु दे माझ्या शेतक-यांचे रान रे.

एक थेंब अमृताचा या उपक्रमात रावेर आणि यावल तालुक्यात जलसंधाराणाची कामे सुरु आहेत. याच अभियानच्या माध्यमातून फैजपूर आणि रझोदा या दोन्ही शिवाराच्या मध्ये धाडी नदीवरील श्री लक्ष्मी नागरी पतसंस्थेने बांधलेल्या श्रीराम सिमेंट बंधार्‍याच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाला सुरवात झाली.

रावेर यावल तालुक्यात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे आणि भविष्यात पावसाचे पाणी जास्तीत जास्त जमीनीत मुरून पाण्याची पातळी वाढली पाहिजे या उद्देशाने जलक्रांती अभियानचे काम सुरु आहे.

बंधार्‍यातील पाण्याची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यात येणार आहे आणि काही भागात आडवे चर मारण्यात येणार आहे. सदरच्या कामामुळे फैजपूर, आमोदा, पिंपरूड, विरोदा, वढोदा, सावदा, कोचुर, रझोदा शिवारातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग या अभियानास लाभत आहे. या कामामुळे शेतकरी आणि ग्रामस्थामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प.पु.महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, प.पु.भक्ती प्रकाशदास शास्त्री, प.पु.भक्ती किशोरदास शास्त्री, प.पू.शास्त्री भक्तीस्वरूपदासजी, प.पु.मानेकर बाबा यांच्या मार्गदशनाने आमदार हरीभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून या कामाला सुरवात झाली. या प्रसंगी संदीप चौधरी, किरण बोरोले, संजय महाजन, अशोक बोरोले, योगेश नेमाडे, चोलदास चौधरी, महेश बोरोले, वसंत बोरोले, वाघूळदे सर, सचिन होले , मोहन होले, चकोर चौधरी आणि समस्थ ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!