Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

देशदूतच्या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत रुची वाणी प्रथम

Share

रावेर|दि.३०|प्रतिनिधी : येथील कमलाबाई गर्ल्स हायस्कूल मध्ये २८ जानेवारी रोजी देशदूतच्या माध्यमातून झालेल्या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत प्रथम इयत्ता ८ मधील रुची वाणी,द्वितीय अनुष्का पाटील,तृतीय हर्षदा राणे,उत्तेजनार्थ मध्ये पंचशील वाघ,श्रद्धा पाटील हिने पारितोषिक पटकावले,या विद्यार्थिनीना बुधवारी पारितोषिक देवून गौरवण्यात आले.

येथील जिमखाना हॉल मध्ये देशदूत प्रायोजित देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत कमलाबाई गर्ल्स हायस्कूल व ज्यू.कॉलेज मधील ९० विद्यार्थीनी सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेचा निकाल बुधवारी जाहीर झाला यात इयत्ता ८ अ मधील रुची श्रीकृष्ण वाणी हिने प्रथम क्रमांक पटकवला आहे. तिला देशदूतच्या वतीने १००१ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.दुसरा क्रमांक इयत्ता ८ अ मधील अनुष्का रामराव पाटील हिने मिळवला तिला ५०१ रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

तिसरा क्रमांक इयत्ता ७ अ मधील हर्षदा ज्ञानेश्वर राणे हिने पटकवला तिला ३०१ रुपये बक्षीस देण्यात आले.तर उत्तेजनार्थ मध्ये इयत्ता ९ अ मधील पंचशीला त्रंबक वाघ,इयत्ता ७ अ मधील श्रद्धा नरेंद्र पाटील हिने बक्षीस मिळवले आहे.या स्पर्धेच परीक्षक प्रभूदत्त मिसर यांनी केले.

तर यशस्वितेसाठी कमलाबाई गर्ल्स हायस्कूल चे उपमुख्याध्यापक शिरीष वाणी यांचे सहकार्य लाभले.बक्षीस वितरण समारंभाला मुख्याध्यापिका सौ एस.डी.वाणी अध्यक्षस्थानी होत्या,बक्षीस वितरण कविता पाटील,योगिता महाजन,देशदूत उपसंपादक चंद्रकांत विचवे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी एस आर वाणी,एस.एम.कानडे,एम.पी.पासपोहे आदी उपस्थित होते.कायर्क्रमाचे सूत्रसंचालन एन.एन.खारे,बक्षीस वाचन एस.एन.महाजन,अहवाल वाचन ए.एल.लासूरकर यांनी केले.आभार एस.आर.पाटील यांनी मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!