बालशौर्य पुरस्कार प्राप्त निलेशचा हरविलेला भाऊ गणपत आईकडे सुपूर्द

0

मुक्ताईनगर | वार्ताहर  :  राष्ट्रीय बालशौर्यपुरस्कार प्राप्त निलेश भील चा भाऊ गणपत भील याचा दीड दोन महीन्यानंतर अखेर कानपूर (उ.प्र.) मधील चाईल्ड होम लाईनमध्ये शोध लागला.

शोध लावण्यासाठी मुक्ताईनगर पोलीसांनी शर्थीचे प्रयत्न केले त्याला बुधवारी यश आले.यामुळे मात्र निलेश व गणपत या अपह्त मुलाच्या आईच्या डोळ्यातून अश्रू तराळले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे रहिवास करणार्‍या तसेच बालशौर्य राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त केलेला १२ वर्षीय मुलगा निलेश रेवाराम भील व त्याचा लहान ८ वर्षीय भाऊ गणपत भील असे दोघांचेही गेल्या दीड दोन महीन्यापासून कोथळी येथील राहत्या झोपडीतून अपहरण झाले होते.

अचानक झालेल्या या घटनेमुळे तसेच आपल्या पोटच्या दोन्ही मुलांमध्ये अपहरण झाल्याने भील कुंटूबावर दु:खाचा डोंगर पसरला होता.

शोधार्थ खा.रक्षाताई खडसे, आ.एकनाथराव खडसे यांचेही सहकार्य लाभले. इतकेच नव्हे तर प्रधानमंत्री कार्यालयातर्ङ्गेही वेळोवेळी विचारणा करण्यात आली. मुक्ताईनगर पोलीसांनी आजुबाजुचे राज्य, जिल्हे, तालुके, रेल्वेस्टेशन,बसस्थानके तसेच सार्वजनिक ठिकाणाच्या तसेच वनांचा, हॉटेल्सचाही शोध घेतला तसेच सतत शोध तपास सुरूच होता.इतकेच नव्हे तर सोशल मिडीयातर्ङ्गे ही शोध घेण्यात येत होता.

अखेर गणपतचा शोध लागला

निलेशचा लहानभाऊ गणपत भील हा उ.प्र.मधील कानपूर येथील चाईल्ड होम लाईनमध्ये १५ दिवसापूर्वी गवसल्याचा भ्रमणध्वनी दि.१६ ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर पोलीसांना आला.ते कळताच तात्काळ दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास पोऊपनि.वंदना सोनुने, पो.कॉ.कांतिलाल केदारे, व विनोद पाटील तसेच निलेश व गणपतची आई सुंदरबाई भील हे पो.नि.अशोक कडलग यांचे मार्गदर्शनाखाली पथक कानपुर येथे रवाना झाले.

रात्रभर प्रवास करून रात्री २ वाजता कानपूर येथे पोहोचल्यानंतर दि १७ रोजी कानपूर कोर्टामार्ङ्गत गणपत भीलला चाईल्ड होन लाईनतर्ङ्गे मुक्ताईनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

मोटारसायकलवर नेले होते दोघांना

कोथळी येथून निलेश व गणपत या दोघांना मोटारसायकलवरून नेण्यात आल्याची माहिती गणपतने सागितली.तसेच दोघेभाऊ सोबतच होते.परंतु कानपुर पोलीसांच्या ताब्यात गणपत एकटाच होता.गणपत ङ्गक्त कोथळी आणि गणपत एवढेच वाक्य कानपुर चाईल्ड होम वाल्यांना सांगत होता.

मातेने हंबरडा ङ्गोडला

गणपत या लहानग्या पोटच्या गोळ्याला पाहता बरोबर निलेशची आई सुंदरबाई भील हीने हंबरडा ङ्गोडून बाळाला पोटाशी धरले.व आनंदाश्रू तराळले.आता माझा निलेश कुठे असेल असा प्रश्‍नही मातेला सतावत आहे.

निलेशचाही शोध सुरू-सोनुने

निलेशचाही शोध सुरू असून लवकरच निलेशचाही शोध लागेल त्यासाठी अथक परिश्रम घेण्यात येत आहे.अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक वंदना सोनुने यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*