धनगर समाजातील २५० गुणवंतांचा सत्कार

0
जळगाव |  प्रतिनिधी :  धनगर समाजातील २५० गुणवंत विद्यार्थ्यांचा आज राज्य धनगर समाज महासंघातर्फे सत्कार करण्यात आला.

राज्य धनगर समाज महासंघातर्फे शहरातील सरदार पटेल सभागृहात गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभाचे अध्यक्ष शरद वसतकर यांच्या हस्ते पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हेमंत कुळकर्णी,प्रदेश महासचिव सुभाष सोनवणे, प्रभाकर न्हाळदे, संतोष धनगर, सुधीर राऊत, राजधर पांढरे, हिलाल सोनवणे, संदीप तेले, विष्णू ठाकरे, सुभाष करे, दिलीप धनगर, रामचंद्र चर्‍हाटे, गणेश बागुल, महेंद्र सोनवणे, धर्मा सोनवणे, गणेश जाणे, डॉ. संजय पाटील, संदीप मनोरे, रूपेश पाली, प्रविण पाचपोळ, रेखा न्हाळदे, मंजुषा सुर्यवंशी, डिगंबर सोनवणे आदी उपस्थित होते.

यावेळी सर्व पोटशाखीय २५० गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश बागुल यांनी केले. सुत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी तर आभार धर्मा सोनवणे यांनी मानले.

यशस्वीतेसाठी प्रविण पवार, डिगंबर सोनवणे, प्रविण धनगर, सुनिल खोमणे, महेंद्र सोनवणे, डॉ. संजय पाटील, संदीप पवार, सुनिल खोमणे आदींनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*