Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

# Video # संत मुक्ताबाई पालखीचे बुलढाणा जिल्ह्यात जोरदार स्वागत

Share

मलकापूर | जि.बुलढाणा :  आषाढी एकादशीस विठू दर्शनाचे तिव्र ओढ व ऊनपाऊसाची तमा न बाळगता निघालेले वारकरी वैष्णवाची दिंडी संत मुक्ताबाई पालखी सोहळा समवेत मलकापूर नगरीत दाखल होताच शहरवासीयांनी शिवाजीनगर पुलाजवळ फटाक्यांचा आतषबाजीत जोरदार स्वागत केले.

श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र पंढरपूर निघालेला पालखी सोहळा तिसर्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर येथे दाखल होताच नगराध्यक्ष हरिष रावळ नायब तहसीलदार राजगडे, नगरसेवक राजेंद वाडेकर व नगरवासीयांनी पालखीचे स्वागत केले. वारकरी मंडळीना कालच्या दुदैर्वी घटनेने हळहळ वाटत होती. पहाटे च्या काकडारती नंतर मृत वारकरी सुधाकर पाटील यांना सामूहिक श्रद्धांजली वाहून पुढील प्रवास सुरू झाला.

भालेगाव ते मलकापूर 6कीमी अंतर भजन गात सहज पार केले.शिवाजीनगरात वारकरीनी मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेतला. याकरिता श्रावण पानसरे व शामराव तळेकर यांचे योगदान लाभले. शहरातून मिरवणूकीने ठीकठीकाणी स्वागत होत होते.बुलढाणा जिल्हा सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव ढगे ,कैलास महाराज धोरण ,योगेश हिवाळे मंगलगेट तरूण मंडळ यांनी शरबत पाणी व्यवस्था केली. गाडेगाव मोहल्ला हनुमान मंदिरात पालखी सोहळा मुक्कामी विसावला. महिलामंडळात उत्साह जबरदस्त होता.  व्यसनमुक्ती संकल्प शपथ 10 जणांना देण्यात आला

बुलढाणा जिल्ह्यात मुक्ताबाई पालखीचे मुक्काम

. दि.11 शेलापूर दि.12टाकरखेड दि.13मोताळा दि.14बुलढाणा दि.15चिखली दि.16खंडाळा,दि.17मेरा बु.,दि.18भरोसा दि.19देऊळगाव मही ,दि20 देऊळगाव राजा आदी मुक्काम राहतील.  तरी भाविकांनी संत मुक्ताबाई पालखी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थान अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांनी केले आहे.

 आरोग्य तपासणी

कालच्या घडलेल्या घटनेवरून बोध घेत वारीसोबतचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. कुळकर्णी यांनी वारकरीना उन्हापासून बचावाची काळजी कशी घ्यावी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. 50 वर जणांना तपासणी करून औषधे दिली.

विश्व हिन्दू परिषद तर्फे पाणीपुरवठा टॅंकर

महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असल्याने देवगीरी प्रांत विश्व हिंदु परिषदेने मानाच्या सात पालखी सोहळ्यात यंदा प्रथमच पाणीपुरवठा टॅंकर पुरविण्याचा निर्णय घेतला त्यानुसार 13000 लीटर टॅंकर चालकासह 60दिवस सोहळ्यात सेवा देण्यासाठी विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत धर्माचार्य प्रमुख बाळासाहेब नागरे यांनी संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांचेकडे सुपूर्द केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!