Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

सातपुडा पायथ्याशी बिबट्यांची दहशत कायम : वरगव्हान येथे  गोऱ्हा  ठार

Share

धानोरा | ता.चोपडा | वार्ताहर : सातपुडा पायथ्याशी असलेल्या गावांत सध्या हिस्त्र प्राण्यांनी दहशत माजवली असुन गेल्या पंधरा दिवसात वेगवेगळ्या पाच ठिकाणी बिबट्याने हल्ले करून अनेक गुरांना ठार केले आहे. रविवारी रात्री वरगव्हान येथील रमेश सिताराम पाटील यांच्या शेतात बांधलेल्या दोन वर्षाच्या गोऱ्ह्यावर बिबट्याने हल्ला करीत ठार केल्याने  शेतकरी वर्गात कमालीची दहशत पसरली असुन शेतशिवारात काम करण्यास मजुर घाबरू लागले आहेत.त्यामुळे वनविभागाने वेळीच या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

याबाबत सविस्तर असे की गेल्या काही दिवसांपासुन परिसरात बिबट्याने वेगवेगळ्या ठिकाणी हल्यांची मालीका सुरूच ठेवली आहे.रविवारी रात्री वरगव्हान येथील रमेश सिताराम पाटील यांचे शेवरे रस्त्यावर शेत असुन शेतात ते रोज रात्री झोपण्यासाठि जातात मात्र रविवारी शेतात विजपुरवठा नसल्याने ते घरीच झोपुन राहीले. सकाळी शेतात गेले असता त्यांच्या गोऱ्हाचा बिबट्याने ठार केल्याचे दिसुन आले. आजुबाजुला बिबट्याचे पायांचे ठसे स्पस्ट दिसत होते.यामुळे या परिसरातही बिबट्याचे वास्तव्य असल्याचे सिद्ध झाल्याने शेतकरी वर्गात ऐन काम धंद्याच्या दिवसात घबराट पसरली आहे.सदर घटनेची माहीती वनविभागाला देण्यात आली असुन पंचनामा करून त्याचे शवविच्छेदन करण्यात आले असुन शासनाने त्वरीत मदत देण्याची मागणी होत आहे.

पंधरा दिवसात झाले पाचठिकाणी हल्ले

गेल्या पंधरा दिवसात वेगवेगळ्या पाच ठिकाणी बिबट्याने हल्ले करून गुरांना ठार केले आहे. मोहरद येथील भाऊसाहेब गिरधर पाटील यांच्या शेतात बांधलेला गोऱ्हा, देवगाव येथील प्रविण सुरेश पाटील यांच्या शेतातली गाय, तर  पुणगाव येथेही गाय व दोन दिवसांपुर्वीच पुणगाव येथे घरी परतणाऱ्या आकाश सुनिल बाविस्कर या तरूणाच्या दिशेने केलेला हल्ला या सर्व घटना वेगवेगळ्या गावात घडल्याने बिबट्यांची संख्या एकपेक्षा जास्त असल्याचे दिसुन येते. त्यामुळे आता प्रयन्त गुरांवर हल्ला करणारे हे बिबटे मणुष्यावर हल्ला करण्याआधी त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

अन्न पाण्याच्या शोधात मानवी वस्तींकडे धाव

सातपुड्यात मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोडीने सुरक्षीत वास्तव्य नाही.कडक उन्हामुळे नैर्सगीक पाणवठे आटले आहेत. परिणामी अन्न मिळणे कठीण झाल्याने बिबट्यासह अनेक जंगली प्राणी माणवी वस्त्यांकडे धाव घेत असल्याने सातपुड्यात वनविभागाने कृत्रीम पाणवठे उभारण्याची मागणी वनप्रेमी करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!