केकी मूस कलादालनाला एक लाख विद्यार्थ्यांच्या भेटीचे नियोजन- आ.उन्मेश पाटील

0
चाळीसगाव | प्रतिनिधी  : जगाला हेवा वाटावा अशी कलाकृती केक मूस यांनी साकरली आहे. मूस यांनी देशात वेगळी ओखळ निर्माण केली आहे. मूस यांनी साकारलेली कलाकृती कला नव्हे, तर येणार्‍या पिढीसाठी संस्कार आहेत.

त्यामुळे येणार्‍या काळात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना विनंती करुन, जिल्हा व राज्यभरातील शाळेतील विद्यार्थ्यांना सहलीच्या माध्यामातून केकी मूस कलादानाला कशी भेट देता येईल यासाठी प्रयत्नशिल असून कलेविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधनासाठी वर्षभरात एक लाख विद्यर्थ्यांच्या भेटीचे नियोजन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आमदार उन्मेष पाटील यांनी केले.

चाळीसगावचे वैभव असलेल्या जगप्रसिध्द कलामहर्षी केकी मूस यांच्या दि.१० रोजी आयोजित नविन कलादालनाच्या भूमीपूजन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भाजापाचे जिल्हाध्यक्ष उद्य वाघ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार ऐ.टी.पाटील, नगराध्यक्षा आशालता विश्‍वास चव्हाण, केकी मूस प्रतिष्ठानचे अध्यक्ष भिकनराव गायकवाड, सचिव कमलाकर सामंत, भाजपचो शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्‍वर पाटील, पं.स.चे उपसभापती संजय भास्कर पाटील, दिनेश बोरसे, नगरसेवक चंदू तायडे, संजय रतनसिंग पाटील, विजय पवार व इतर नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.पाटील म्हणाले की, चाळीसगाव तालुक्यात पर्यटन विकासाच्या माध्यमातून रोजगार प्राप्ती करण्याच्या दृष्टीकोनातून वाटचाल सुरु आहे. त्यासाठी वाघळी येथील मुधाई माता मंदिरासाठी, पाटणा देवी व केकी मूस कलादालानासाठी गेल्या ५० वर्षात मिळालेला नाही, असा जवळपास १० ते १५ कोटीचा निधी मिळाला आहे.

मूस कलादालनासाठी २ कोटी ७३ लाखांचा निधी मिळाला असून आता येथे दोन मंजली कलाप्रेमीसाठी हक्का नुतन कलादालन उभे राहणार आहे.

यात १२ हजार स्वे.फु.ची भव्य गॅलरी उभी करण्यात येणार आहे. शहरातील फोटो ग्राफर असो. व कला शिक्षणकांनी ह्या गॅलरीचा उपयोग भावी पिढीसाठी स्किल डेव्हलपमेंन्टसाठी करुन घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

चाळीसगावची ओळख केकी मूस, भास्करांचार्य मुळे होते. त्यामुळे लवकरच केंद्रीय मंत्र्यांना भेटुन भारतातील मोठ्या पर्यटनस्थाळामध्ये केकी मूस कलादालनांचे नाव समाविष्ठ करणार असल्याचे यावेळी मनोगत व्यक्त करताना खासदार ऐ.टी.पाटील सांगीतले. तसेच केकी मूस व गणित नगरीचे मोठे बॅनर चाळीसगाव रेल्वे स्थानकावर लावणार असल्याचेही ते म्हणाले.

केकी मूस कलादालनाच्या विकासासाठी आम्ही गेल्या २७ वार्षांपासून प्रयत्न करीत आहोत. माजी मंत्री छगन भुजबळ, मा.आ.अरुण गुजराथी तसेच इतर मंत्र्यांनी भेटी दिल्यात,

परंतू गेल्या २७ वर्षांपासून केकी मूस कलादालान उपेक्षीत होते. यासाठी आतापर्यंत ५३० वेळा मंत्रालयाच्या चक्रा मारल्या आहेत. आता नविन होऊ घातलेल्या कलादालानामुळे खर्‍या आर्थान आम्हाला न्याय मिळाला आहे.

पुढे केकी मूस(बाबुजी) यांच्यावर पोस्टाचे टिकिट काढण्यात यावे, तसेच चाळीसगाव येथे ओडीसी ट्रेनला थांबा देण्याची मागणी यावेळी आपल्या प्रास्ताविकातून केकी मूस प्रतिष्ठानचे सचिव कमलाकार सामंत यांनी खासदार ऐ.टी.पाटील यांच्याकडे केली.

यावेळी कलाक्षेातील सर्व मान्यवरांची सत्कार करण्यात आला. परिसरातील सर्व कलाप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन शालीग्राम निकम सर यांनी केले, तर आभार आमोल नानकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

*