Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

कठुआ बलात्कार प्रकरणी पाच आरोपी दोषी : पठाणकोट न्यायालयाचा निर्णय

Share

पठाणकोट : जम्मू- काश्मीरमधील कथुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी पठाणकोटमधील न्यायालयाने पाच आरोपींना दोषी ठरवले आहे.

कथुआ येथील आठ वर्षांच्या मुलीचे घरातून १० जानेवारी २०१८ रोजी अपहरण झाले होते. तिला आठ दिवस एका मठात ओलीस ठेवण्यात आले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि अघोरी धार्मिक विधीही केले गेले. त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आठवडाभरानंतर तिचा मृतदेह याच जंगलात आढळला होता. या सामूहिक बलात्कार प्रकरणाने देशाला हादरवून सोडले होते.

सुप्रीम कोर्टाने या खटल्याची सुनावणी जम्मू- काश्मीरबाहेर घेण्याचे आदेश दिले होते. यानुसार पठाणकोटमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. ३ जूनला या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती. या प्रकरणात एकूण ११४ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.

सोमवारी न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला. न्यायालयाने सात पैकी पाच आरोपींना दोषी ठरवले आहे. मुख्य आरोपी सांजी राम, त्याचा मुलगा विशाल, दीपक खजुरिया, सुरेंदर वर्मा, तिलक राज या पाच जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

गुन्हे शाखेने या प्रकरणात गावाचे प्रमुख सांजी राम, त्यांचा मुलगा विशाल, अल्पवयीन भाचा, विशेष पोलिस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंदर वर्मा यांना अटक करण्यात आली होती.

. हेड कॉन्स्टेबल टिळक राज आणि उपनिरीक्षक आनंद दत्ता यांनाही अटक करण्यात आली होती. बलात्कार आणि खून प्रकरणाचा आरोप आठपैकी सात आरोपींवर ठेवण्यात आला होता. एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याच्याविरोधात खटला सुरू करण्यात आला नाही. या आरोपीच्या वयाबाबत जम्मू-काश्मीर हायकोर्ट निकाल देणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!