Type to search

maharashtra जळगाव

मुक्ताबाई पालखीतील वारकर्‍याचा उष्माघाताने मृत्यू

Share

मलकापूर   | प्रतिनिधी :  श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी मुक्ताईनगर जि जळगाव येथून आषाढी वारी पंढरपूर कडे निघालेल्या पालखीतील सुधाकर जगन्नाथ पाटील या तरूण वारकर्याचा बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करताना रूईखेड -भालेगाव दरम्यान प्रवासात भर दुपारी उष्माघाताने निधन झाले. सध्या उषणतेची लाट चालू असून त्याचा चटका वारकरी भाविकांना बसत आहे

काल मुक्ताबाई पालखी ने मुक्ताईनगर येथून प्रस्थान ठेवले होते.आज दुसर्या दिवशी दुपार विसावा रूईखेड ता. मुक्ताईनगर येथे घेतला . विश्रांती नंतर पालखी सोहळा भालेगाव ता. मलकापूर जि.बुलढाणा मुक्कामी जात असतांना सुरूवाती पासून सोहळ्यात दाखल झालेले वारकरी सुधाकर जगन्नाथ पाटील वय 38 रा. भावसा ता.जि. बुरहानपूर मध्यप्रदेश यांना चक्कर येवून अत्यवस्थ झाले.

सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे नितीन महाराज अहीर यांनी तातडीने 108 रुग्णवाहिका बोलावून मलकापूर येथील  उपजिल्हारूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचार दरम्यान त्यांना मृत्यू आला. संस्थानचे अध्यक्ष रविंद्र पाटील ,. मलकापूर नगराध्यक्ष हरीशभाऊ रावळ , मनसे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर , विशाल महाराज खोले यांनी विशेष सहकार्य केले.

नगराध्यक्ष स्वतः नातेवाईक येईपर्यंत हजर राहीले. नातेवाईकांना प्रेत ताब्यात देवून भावसा येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. घरची मंडळी नाही म्हणत असतांना एक तरी वारी आयुष्यात करावी या भावनेने गावातील महिला व पुरूष वारकरी सोबत पहील्यांदा वारीत सहभागी झाले होते. पश्चात पत्नी दोन लहान मुले भाऊ असा परिवार आहेत

कारवाई व्हावी

वारीत शासकीय आरोग्यसेवा पथक नियुक्त करूनही दुसर्या दिवशीही सोहळ्यात हजर झाले नाही. कदाचित हजर असते तर उपचार वेळीच मिळाले असते . संबंधितांनी कामचुकारपणा करणारे डाॅक्टरवर कारवाई करावी अशी वारकरी भाविकात तिव्र भावना आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!