वेगवेगळ्या गुन्ह्यात १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल : एएसपी निलोत्पल यांच्या पथकाची कारवाई

0
भुसावळ |  प्रतिनिधी :  शहरातील जुना सातारा भागात ताडीच्या मळ्यात सुरु असलेल्या दारु विक्रीवर पोलिसांनी छापा मारुन १५ हजार ३८० रुपयांचा दारु साठा जप्त करण्यात आला.

मात्र आरोपी घटनास्थाळावरुन पसार झाला. दुसर्‍या घटनेत सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी हद्दपार आरोपीसह तीघांना ताब्यात घेण्याची तर साकरी फाट्याजवळ झन्नामन्ना खेळणार्‍या ११ जाणांवर सहाय्यक पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने  कारवाई केली.

येथील जळगाव रोड वरील जुना सातारा भागातील मरीमाता मंदिराजवळील ताडीच्या मळ्यात दि. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी दारूची विक्री सुरु असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मारुन करवाई करत दारुसाठा जप्त केला. दि. १५ ऑगस्ट रोजी ड्राय डे असल्यामुळे तडीरामांची गैरसोय होऊ नये यासाठी एक दिवस आधीच दारूची विक्री जादा दराने ताडीच्या मळ्यातील झाडाझुडपात सुरू होती.

याबाबत सहाय्यक पोलिस अधीक्षक निलोत्पल यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वसंतराव मोरे यांचे मार्गदर्शनाखाली एएसआय फारुख शेख, एएसआय निकम, पोलीस नाईक कमलाकर बागुल, विजय पाटील यांनी छापा टाकला.

मात्र आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला.पोलिसांनी घटनास्थळावरुन १५ हजार ३८० रुपयांचा मद्यसाठा त्यात मास्टर ब्रँड कंपनीच्या ९६ बॉटल व ऑफिसर चॉईस कंपनीच्या २६ बॉटल ताब्यात घेण्यात आल्या. याबाबत शहर पो.स्टे.ला गु.र.नं. ६०४१/१७ कलम ६५ (इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एएसआय फारुख शेख करीत आहे.

हद्दपार आरोपीसह तिघांकडून मारहाण

शहरातील सत्यम ट्रेडर्स दुकानावरील सुरक्षा रक्षक ड्युटी करत असतांना तीन-चार युवकांनी मारहाण केल्याची घटना दि.१५ रोजी घडली. या प्रकरणी हद्दपार आरोपीसह तीघांना ताब्यात घेण्याची कारवाई बाजारपेठ पोलिसांनी केली.

संजय लक्षमण भारंबे (वय ५२, धंदा- वॉचमन रा.शिव कॉलनी, शिवपुर-कन्हाळा रोड, भुसावळ) हे सुहास हॉटेल जवळील सत्यम ट्रेंडस दुकानावर वाचमन काम करतात दि. १५ रोजी ३-४ आरोपींनी हात पकडुन छातीवर, तोंडावर, पाठीवर लाथा बुक्यांनी मारहाण केली.

भारंबे यांनी आरोपींना प्रतिकार केला असता एका आरोपीने भारंबे यांच्या उजव्या डोळ्याच्या भुईवर धारदार शस्त्राने मारहाण केली. त्यांचा खिशातील एक हजार रुपये बळजबरीने काढुन घेतले व त्यांचा हातातील घड्याळ हिसकावत असतांना त्यांनी आरडा ओरड सुरु केली.

परिसरातील नागरिक जमा होताच आरोपींनी पळ काढला होता. याबाबत डीबी पथकाने आरोपींचे वर्णन विचारुन आरोपींचा शोध घेतला असता आरोपी रेल्वे उड्डाण पुलाजवळ असल्याची गुप्त माहीती सहाय्यक पोालिस उपअधीक्षक निलोत्पल, पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉं युवराज नागरुत, पोना बंटी सैंदाणे, सुनील थोरात, रविंद्र बिर्‍हाडे, जयराम खोडपे, पोकॉं कृष्णा देशमुख यांनी सापळा रचुन आरोपींना ताब्यात घेवून त्यांना पो.स्टे. ला आणुन कसुन चौकशी केली असता हद्दपार आरोपी निखील सुरेश राजपूत, भुषण प्रल्हाद राजपुत, नकुल नाथसिंग राजपुत (तिन्ही रा.श्रीराम नगर, भुसावळ) असे त्यांनी सांगितले.

त्यानुसार बाजारपेठ पो.स्टे. ला गु.र.नं. १३४/१७ भा.दं.वि. ३९४, ३४ प्रमाणे कारवाई केली असुन त्या गुन्ह्याचा तपास सहा.फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.

झन्नामन्ना खेळणार्‍यांवर कारवाई

शहरात साकरी फाट्या समोरील हॉटेल यशवंत पहेलवानच्या ढाब्या जवळ असलेल्या मोकळ्या जागेत ढाब्याच्या बाहेरील लावलेल्या लाईटाच्या उजेडात काही लोक झन्नामन्ना जुगार खेळत असल्याची माहिती एएसपी निलोत्पल व पोनि चंद्रकांत सरोदे यांना मिळाल्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पो.स्टे.चे पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र नरवाडेे, डीबीचे पो.हे.कॉं. निशिकांत जोशी, पो.ना.बंटी सैंदाणे, सुनील थोरात, जयराम खोडपे, नरेंद्र चौधरी, पो.कॉं कृष्णा देशमुख, नीलेश बाविस्कर, दिपक जाधव, प्रशांत चव्हाण, राहुल चौधरी, उमाकांत पाटील यांनी सापळा रचून झन्नामन्ना खेळणार्‍या ११ जणांना ताब्यात घेवून त्यांच्याकडुन १६ हजार ५०० रोख जप्त केले.

त्या ११ इसमांविरुद्ध गु.र.नं. ३१४४/१७ मुंबई जुगार ऍक्ट १२ अ प्रमाणे दाखल करण्यात आला असुन त्या गुन्ह्याचा तपास पोहेकॉं निशिकांत जोशी करीत आहे.

LEAVE A REPLY

*