Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव धुळे

जळगाव घरकुल खटल्याचा आज निकाल शक्य

Share

धुळे । गाजलेल्या जळगाव घरकुल खटल्याचा उद्या दि. 7 जून रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे.

जळगाव घरकुल खटलाचे कामकाज न्या.सृष्टी निळकंठ यांच्या न्यायालयात सुरु आहे. या खटल्यात 48 संशयित असून त्यात माजीमंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर, जगन्नाथ वाणी, प्रदीप रायसोनी, राजेंद्र मयूर, तत्कालीन मुख्याधिकारी पी.डी.काळे, विजय कोल्हे, आ.चंद्रकांत सोनवणे, राम जाधव, पुष्पा पाटील, पटवे, अजय जाधव यांचा समावेश आहे.

खटल्याचे पुढील कामकाज 7 जुन रोजी होणार आहे. त्यादिवशी निकाल लागण्याची शक्यता आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.प्रवीण चव्हाण, तर आरोपींतर्फे अ‍ॅड.अविनाश भिडे, अ‍ॅड.राजाभाऊ ठाकरे, अ‍ॅड.प्रकाश पाटील, अ‍ॅड.अकील इस्माईल, अ‍ॅड.सी.डी.सोनार, अ‍ॅड.एस.आर.वाणी, अ‍ॅड.जितेंद्र निळे हे कामकाज पाहत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!