गोगादेव नवमीनिमित्त मेहतर समाजातर्फे छडी मिरवणूक

0
जळगाव । दि.16 । प्रतिनिधी-श्री गोगादेव नवमीनिमित्त शहरातून मेहतर समाजबांधवांतर्फे छडी मिरवणुक काढून समाजाचे आराध्य दैवत गोगादेव महाराज, नवलस्वामी महाराज व वीर पुरुष रात्नासिंग महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
राष्ट्रीय संत नवलमहाराज व गोगादेवजी महाराज यांना सहकार मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर विधीवत पुजन करण्यात आले.

यावेळी आ.राजुमामा भोळे, माजी आ.सुरेशदादा जैन, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापौर नितीन लढ्ढा, माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली.

वीर गोगादेवजी नवमीनिमित्त छडी मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत विष्णु वराह अवतार, गजानन महाराज, नवनाथ महाराज, गोरक्षनाथ, भगवान शिवशंकर आदी धार्मीक देखावे साकारण्यात आले होते.

मिरवणुकीला गुरुनानकनगरपासून सुरुवात झाली. त्यानंतर शोभायात्रा चौबे शाळा, सुभाष चौक, दाणाबाजार, सानेगुरुजी चौक, टॉवर चौक मार्गे जिल्हा परिषदजवळील चौकात असलेल्या रामदेवबाबा मंदिर व गोगादेवजी महाराज मंदिराजवळ आली. छडी मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी करीम सालार, सुरेश उज्जैनवाल, अरुण चांगरे, आत्माराम ढंढोरे, जितेंद्र करोसिया, जयचंद सोनवाल आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*