Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

#Video # कुंचला अन् रांगोळीत दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

Share

पर्यावरण संरक्षणासाठी चाळीसगाव नगर परिषदेचा पुढकार

चाळीसगाव । दि. 5 । प्रतिनिधी :   नगरपरिषदेतर्फे पर्यावरण दिनानिमित्ताने दि.5 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण जनजागृतीसाठी भिंती चित्रिकरण, रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांच्या माध्यमातून पर्यावरण बचाव, स्वच्छता, पाणी अडवा पाणी जिरवा, वृक्षारोपण, जलसाक्षरता, रेनवॉटर हार्वेस्टिंग याबाबत जनजागृती करण्यात आली.

पर्यावरण जनजागृतीपर आयोजित भित्तीचित्र स्पर्धेत 20 स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात चित्रकलेचे विद्यार्थी, शिक्षक, महिला व नागरिकांचा समावेश होता. नगर परिषदेच्या वॉल कपाऊटच्या भिंतींवर पर्यावरण विषयक संदेश देणारी वेगवेगळी बोलकी चित्रे काढुन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

भित्तीचित्र स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर रांगोळी स्पर्धत तब्बल 45 महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला, रांगोळीच्या माध्यामातून पृथ्वीवरील वाचविण्यासाठी पर्यावरणाची गरज, वृक्षारोपण काळाची गरज, स्वच्छता, पाणी अडवा पाणी जिरवा, वृक्षारोपण, जलसाक्षरता, रेनवॉटर हार्वेस्टिंग या विषयास अनुसरुन रांगोळीतून चित्रे रेखाटली. रांगोळी स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

तर प्रथम क्रमांकला पैठणी, तृतीय क्रमाकाला डिनर सेट, तृतीय क्रमांकाल वॉल वॉच आदि बक्षिसे देण्यात येणार आहे. या स्पर्धा मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी पार पडल्यात. यावेळी नगरसेविक सविता राजपूत यांनी देखील न.पा.च्या भितींवर स्वता; चित्र काढलीत.

vvयाप्रसंगी नगर परिषदेचे आधिकारी, कर्मचारी यांच्यासह नगरसेवक सुर्यंकात ठाकुर, गिरधर चौधरी यांच्या पर्यावरण प्रेमी उपस्थित होते

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!