Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

संत मुक्ताबाई आषाढी वारी पालखी सोहळ्याचे शनिवारी प्रस्थान 

Share

व्यसनमुक्तीचा जागर करण्याचा संकल्प

मुक्ताईनगर | प्रतिनिधी : . महाराष्ट्रात मानाच्या सात पालखी सोहळ्या पैकी संत मुक्ताबाई समाधीस्थळावरून 310 वर्षापासून अखंडित परंपरेने आषाढी वारीला जाणारी संत मुक्ताबाई पालखी क्षेत्र मुक्ताईनगर ते पंढरपूर येत्या 8 जून शनिवारी प्रस्थान ठेवणार आहे. यावर्षी पालखी सोहळा मार्गात व्यसनमुक्तीचा जागर करण्याचा संकल्प केला आहे.

माझे जीविची आवडी ! पंढरपूरा नेईन गुढी !! या संतोक्तिं नुसार वारकरी संप्रदायात परंपरेने चालत आलेल्या आषाढी वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो दिंड्या पालख्यासह निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या मानाचे सात पालखी सोहळे त्यांचे समाधीस्थळावरून जात असतात.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून संत मुक्ताबाई पालखी 310वर्षे पासून अविरत नेण्याची परंपरा लाभली असून यावर्षी वैष्णवांचे मेळ्यासह 8जून शनिवारी मुक्ताबाई पालखी प्रस्थान ठेवणार आहे. 33 दिवसांचा 750 कीमी. प्रदिर्घ पायी प्रवास करत 10 जुलै रोजी पंढरपूरात दाखल होईल.

वारीत पायी चालतांना कायीक वाचीक व मानसीक तप होत असल्याने हजारो वारकरी सोहळ्यात सामील होतात. यामध्ये खानदेश विदर्भासह मध्यप्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने असतात. जळगाव , बुलढाणा, जालना, बीड , उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यातील 18 तालूके व 300 वर गावे दिंडी सोहळा मार्गात येतात. या गावात व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी निश्चितच अल्पसा प्रयत्न म्हणून यावर्षी संत मुक्ताबाई संस्थान कोथळी- मुक्ताईनगर प्रत्येक गावागावात तरूणांचे समुपदेशन करून त्यांना व्यसनापासून परावृत्त होण्याची शपथ देवून माळकरी बनविण्यात येणार आहे. याकामी संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्तीचा जागर राबविण्यात येणार आहे.

सोहळ्याची जय्यत तयारी

नाचणखेडा जि.बुरहानपूर येथील प्रकाश रामू पाटील यांना रथाकरिता बैलजोडीचा मान सलग सातव्या वर्षी मिळाला असून ता. 6 रोजी विधिवत पूजन करून बैलजोडी संस्थानमध्ये दाखल होईल. सध्या रथाची पाॅलीस , पताका बनविणे , पुजेचे साहीत्य आदि सामानाची जुळवाजुळव तयारी जोरात चालू आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने पालखी मार्गात पाण्याचे टॅंकर शासनाने वाढवून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे अशी माहिती अध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांनी दिली.

यंदाचे आषाढी वारीत सहभागी होणार्या भाविकांची नांवे नोंदणी सुरू झालेली आहे . तसेच प्रस्थान सोहळ्यात भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन पालखी सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे व्यवस्थापक उध्दव जुनारे यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!