जगातील ‘टॉप टेन’खाद्यपदार्थांमध्ये मसाला डोसा !

0
लंडन | वृत्तसंस्था : जगातील सर्वात आदर्श खाद्यसंस्कृती कोणती असेल तर ती भारतीयच. चौरस आणि पौष्टिक आहार हा केवळ भारतातच आढळेल.

पाश्‍चात्त्यांप्रमाणे किंवा चिन्यांप्रमाणे आपल्याकडे एक तर बेचव किंवा अमर्याद तेलकट-मसालेदार पदार्थ केले जात नाहीत. चर्व्य, चोष्य, लेह्य आणि पेय अशा चारही प्रकारचे असंख्य खाद्यप्रकार भारतात आढळतात.

त्यापैकी दाक्षिणात्य प्रकारांमधील मसाला डोसा सर्वत्र आवडीने खाल्ला जातो. या मसाला डोशाला आता एक वेगळे वलय प्राप्त झाले आहे. जगातल्या ‘टॉप टेन’ पदार्थांच्या यादीत मसाला डोसा विराजमान झाला आहे.

‘वाशिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्राच्या ट्रॅव्हलर्स ब्लॉगवर या पदार्थांची एक यादी झळकली आहे आणि त्यात मसाला डोसाही आहे. ‘संपूर्ण ताट झाकणारा, पेपर इतका पातळ, तांदूळ आणि उडदाच्या डाळीपासून बनवलेला, गरम तव्यावर नाजूकपणे शिजवलेला, आत उकडलेल्या बटाट्याची भाजी, रस्सा आणि पातळ चटणीबरोबर अप्रतिम लागणारा पदार्थ’, अशा शब्दांत या वेबसाईटवर मसाला डोशाचे (खमंग!) वर्णन करण्यात आले आहे.

मसाला डोशासोबतच चीनमधील पीकिंग डक, अमेरिकेतील बीबीक्यू रीब्स आणि जपानमधील तिपानयाकी या प्रसिद्ध पदार्थांचाही या यादीत समावेश आहे.

ङ्ग्रान्समध्ये गोगलगायीपासून बनवण्यात येणारा आणि शिंपल्यात वाढला जाणारा, मिलॅन्गी नावाच्या स्वाद्दिष्ट चटणीत बटरमध्ये बनवल्या जाणार्या ऍस्कॅरॉगस या पदार्थाचाही या यादीत समावेश आहे.

इटलीतील झुच्चीनी ङ्गुले, मलेशियातील लक्सा ही सी-ङ्गूड करी, थायलंडमधील सोम टॅम किंवा ग्रीन पपाया सॅलेड आणि ऑस्ट्रेलिया-न्यूझिलंड पावलोवा हे पदार्थही यामध्ये आहेत.

LEAVE A REPLY

*