पारोळा तालुक्यात राष्टध्वजास वंदन

0
 पारोळा| प्रतिनिधी : पारोळा तालुक्यातील विविध संस्थांमध्ये ध्वजारोहण करून वंदन करण्यात आले.

श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलीत पूर्व प्राथमिक ,प्राथमिक ,डॉ.व्ही.एम.जैन.माध्यमिक विद्यालय, सौ.एम.यू.करोडपती इंग्लीश मिडीयम स्कूल तसेच आप्पासो.यु.एच.करोडपती उच्च माध्य.विद्यालयात 71व्या स्वातंत्र दिना निमीत्त ध्वजारोहण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यु.एच .करोडपती यांच्या हस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ.सचिन बडगुजर संचालक सौ.मंगला करोडपती, सुनिल बडगुजर तसेच बालाजी संकूलातील मुख्याध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

ध्वजारोहण  प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यानी देशभक्तीपर गीत सादर केले. तसेच ध्वजारोहणा नंतर स्वच्छते बाबत शपथ घेतली व वाढदिवस असणार्‍या सर्व विद्यार्थ्याना शुभेच्छा देवुन खाउ वाटप करण्यात आला .या प्रसंगी पालकही मोठ्या संखेने हजर होते

  कृषी उत्पन्न बाजार समिती

कृषी उत्पन्न बाजार समिती  येथील ध्वजारोहण जेष्ठ कष्टकरी हमाल बांधव  भानुदास रामदास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.या प्रसंगी मा.आ. चिमणराव पाटील,सभापती अमोल पाटील,उपसभापती प्रेमानंद पाटील, चतुर पाटील, जिजाबराव पाटील,डाँ पी के पाटील व कर्मचारी उपस्थित होते .

खेडीढोक येथे स्वातंत्र्य दिन साजरा

पारोळा तालुक्यातील खेडीढोक येथील गाम पंचायतीवर दिलीप पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण  तर जिल्हा परीषद शाळेवर सरपंच भगवान पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर संगणक परीचालक संगाम पाटील यांच्या कडून इ.१ते ७ विद्यार्थ्यांना वह्या व पेन्सिल वाटप करण्यात आले.

यावेळी गावातील विकासो चेअरमन प्रदिप पाटील ,पो.पाटील उषाबाई पाटील ,सुनिल पाटील तलाठी अतुल तागडे,जब्बारसिँग पाटील ,जे.डी.सी.सी.बँकेचे सुधाकर पाटील ,अंगणवाडीच्या शिक्षीका प्रतिभा, पाटील ,वसंत पाटील, व जि.प.शिक्षक प्रदिप राजपूत .रामेश्वर भदाणे ,लोहार सर ,मोरे सर, नूतन मँडम व गावातील विविध पदाधिकारी उपस्थित होते .

 

LEAVE A REPLY

*