Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

रमजान ईदनिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी लगबग

Share

जळगाव । प्रतिनिधी :  मुस्लिम बांधवांच्या प्रवित्र मानल्या जाणारा रमजान ईदचा सण बुधवारी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. रमजान ईदनिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी समाजबांधवांची गर्दी होत आहे. रमजान ईदचा सण अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला असल्याने सकाळपासूनच बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होवू लागली आहे. रेडिमेड, स्टालिश लुक असलेल्या कपड्यांना तरुणांकडून पसंती दिली जात आहे. ईदनिमित्त रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ गजबजलेली दिसून येत आहे.

रमजान महिना सुरु असल्याने घरातील लहान मुलांपासून अबालवृध्दापर्यंत सर्वच जण रोजा करीत आहे. मुस्लिम बांधवाकडून बुधवारी देशभरात ईदचा सण उत्साहात साजरा करण्यात येत असल्याने खरेदीसाठी शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या फुले मार्केट, गांधी मार्केट, डी-मार्ट यासह शहरातील प्रमुख शोरुममध्ये सकाळपासून गर्दी दिसून येत आहे.

पुरुषांसह महिलांवर्गाकडून खरेदीसाठी लगबग सुरु आहे. महिला नवीन कपड्यांसह, चपला, बांगड्या, मेंहदीचे कोन खरेदी करतांना दिसून आल्या.फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

सायंकाळच्या वेळी फुले मार्केट परिसरात प्रचंड गर्दी होत असल्याने पायी चालणे देखील जिगरीचे ठरत होते. उन्हाचे चटके जाणवत असतांना सकाळपासून बाजारपेठेत वर्दळ दिसून होत असल्याने उन्हातही नागरिकांमध्ये खरेदीचा उत्साह कायम दिसून आला.

रंगीबेरंगी शेवया, खजूर दाखल

ईदनिमित्त रंगीबेरंगी शेवया, वेगवेगळया प्रकारचे खजूर बाजारात उपलब्ध आहे. रंगीबेरंगी शेवयांना नागरिकांकडून अधिक मागणी दिसून येत आहे. हैद्राबाद, मालेगाव येथून रंगीबेरंगी शेवया व खजूर बाजारपेठेत दाखल झाले आहे. ईदनिमित्त कपड्यासह शुरखिर्मासाठी लागणारा सुकामेवा व रंगीबेरंगी शेवया व खजूर खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे.

शिरखुर्म्यासाठी सुकामेव्याला मागणी

ईदच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या नातेवाईकांकडे जाऊन भेट घेवून ईदच्या शुभेच्छा देत असतो. त्यांना शिरखुमा खाण्यासाठी देण्यात येत असतो. शिरखुर्म्यासाठी लागणार्‍या शेवाया, काजू, बदाम, किसमीस यासह विविध प्रकारचा सुकामेवा खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. शहरात अनेक ठिकाणी सुकामेव्याची दुकाने थाटली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!