Type to search

जळगाव

फैजपूरच्या धनाजी नाना महाविद्यालयात उद्यापासून राष्ट्रीय छात्र सेनेचे शिबीर

Share

18 महाराष्ट्र बटालीयन एन.सी.सी. तर्फे आयोजन

फैजपूर, ता. यावल । वार्ताहर  :   येथील तापी परीसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात 18 महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. जळगाव च्या वतीने दहा दिवशीय वार्षिक प्रशिक्षण शिबीरास उद्या दि. 4 जूनपासून सुरवात होत आहे.

हे प्रशिक्षण शिबिर 4 जुन ते  13 जून 2019 दरम्यान आयोजित करण्यात येत आहे. दिल्ली येथील प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या थल सैनिक कॅम्पच्या पूर्व तयारीसाठी प्रस्तुत कॅम्प आयोजित होत आहे. शिबिराचे समादेशक अधिकारी कर्नल सत्यशील बाबर असून प्रशासकीय अधिकारी मेजर सुशील कुमार, ए. एन. ओ. साहेब सुभेदार मेजर अनिल कुमार, जे. सी. ओ. एन. सी. ओ. , अधिकारी व जिलह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील एन.सी.सी.चे विद्यार्थी, विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील जे. डी, जे. डब्लू. आणि एस. डी. एस. डब्लू कडेट्स यांना लष्करी प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. यापुर्वी धनाजी नाना महाविद्यालयात 2009, 2011, 2012 व 2016 अशी चार शिबिरे घेण्यात आली आहेत. 18 महाराष्ट्र बटालियन एन सी सी जळगाव परीक्षेत्रातील एकमेव महाविद्यालय आहे. या शिबिरात ओबीस्टिकल कोर्स सोबतच फायरिंग, बॅटल फिल्ड बॅटल क्राफ्ट, जगिंग डिस्टन्स, मॅप रिडींग बाबत शिकवले जाणार आहेत.

सामाजिक प्रशिक्षण

याखेरीज रक्तदान शिबिरांचे आयोजन, स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाव, धुम्रपान विरोधी अभियान, एड्स जनजागृती आदी सामाजिक विषयांवर व्याख्याने, रॅली आणि मार्गदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

शिबिरात आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार, बँकिंग क्षेत्रातील बचतीचा फायदा, व्यक्तिमत्व विकास, पोस्टल सेवेची कार्यपद्धती, फायर ब्रिगेडचे कार्य, ट्राफिक पोलिसांचे कार्य आदी विषयावर तज्ञ मार्गदर्शकांचे व्याखाने आयोजित केलेली आहेत.

शिबिरात 400 कडेट्स सहभागी होत असून 135 मुली आणि 265 मुले असतील. यासोबत सुमारे 50 अधिकारी आणि कर्मचारी असणार आहेत. शिबिरातील मुले जळगाव जिल्ह्यातील पाल, खिरोदा, फैजपूर, सावदा, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, सामनेर, भुसावळ, जळगाव, धरणगाव आदी ठिकाणाहून सहभागी होणार आहेत.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर मंडळाचे अध्यक्ष तथा रावेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरिषदादा चौधरी, उपाध्यक्ष प्रा. डॉ. एस. के. चौधरी, उपाध्यक्ष दामोदर पाटील, चेअरमन लिलाधर विश्वनाथ चौधरी, व्हॉ. चेअरमन प्रा. के. आर. चौधरी, सचिव प्रा. एम. टी. फिरके, सदस्य मिलिंद वाघुळदे, प्रा. पी. एच. राणे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. आर. चौधरी, उपप्राचार्य प्रा. डॉ. अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा. अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा. डॉ. उदय जगताप, उपप्राचार्य प्रा. दिलीप तायडे, एन. सी. सी. अधिकारी प्रा. लेफ्टनंट राजेंद्र राजपूत, शिक्षकेतर कर्मचारी, युवराज गाढे, नितिन सपकाळे, शेखर महाजन, चेतन इंगळे, प्रकाश भिरुड, नारायण जोगी, एन. सी. सी. कडेट्स यांचे सहकार्य लाभत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!