शेतकर्‍यांना स्लीपद्वारेही रक्कम काढता येणार

0

जळगाव / एटीएम कार्ड सक्तीविरोधात शेतकर्‍यांनी तीव्र आंदोलन केल्याने जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहीणी खडसे व ज्येष्ठ संचालक आ. एकनाथराव खडसे यांच्या मध्यस्थीमुळे शेतकर्‍यांना स्लीपद्वारेही रक्कम काढता येणार असल्याचे परीपत्रक जारी करण्यात आले आहे.

जिल्हा बँकतर्फे डिजीटलायझेशनसाठी शेतकरी सभासदांना क्रेडीट व डेबीट कार्ड देण्यात आले होते.

ग्रामीण भागात एटीएमची मर्यादीत असलेली संख्या, रोकड रकमेचा अभाव आणि कार्ड वापरतांना येणार्‍या अडचणींमुळे शेतकर्‍यांना त्यांच्या खात्यातुन रक्कम काढता येत नव्हती.

यासंदर्भात जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, अनिल भाईदास पाटील, तिलोत्तमा पाटील यांच्यासह शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेत धडक दिली होती.

या आंदोलनाची बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहीणी खडसे व ज्येष्ठ संचालक आ. एकनाथराव खडसे यांनी दखल घेत वरीष्ठ पातळीवर चर्चा केली.

त्यामुळे आता शेतकरी सभासदांना स्लीपद्वारेही रक्कम काढण्यासंदर्भात परीपत्रकच जारी करण्यात आले.

कर्ज खात्यातुन रक्कम काढतांना शेतकर्‍यांची स्लीप व्यवस्थापकांनी तपासुनच रक्कम अदा करावी असे आदेश अध्यक्षा अ‍ॅड. रोहीणी खडसे यांनी दिले आहे.

या निर्णयामुळे जिल्हा बँकेच्या शेतकरी सभासदांची मोठी अडचण दुर झाली आहे.

LEAVE A REPLY

*