Type to search

Breaking News maharashtra जळगाव मुख्य बातम्या

# Breaking # सुविधा एक्स्प्रेसचे पिंपरखेड ते नांदगाव दरम्यान चाक तुटले

Share

मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक तीन तास होणार ठप्प

चाळीसगाव। प्रतिनिधी :   जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आज सकाळी बरोली येथून लोकमान्य टिळक टर्मिनस कडे जाणारी हॉलिडे स्पेशल सुविधा एक्स्प्रेस क्रमांक 02062 हिचे इंजिनचे चाक तुटल्याने मोठा अपघात झाला.

यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक जवळपास पुढील तीन तास ठप्प होणार असल्याचे समजते आहे सकाळी साधारण 8 ते 8-30 वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला असून ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे.

शक्यतो रेल्वेचे चाक कधीच तुटत नाही परंतु आज झालेला हा अपघात अनेक वर्षानंतर झालेला पहिला अपघात आहे. वेळीच इंजिनच्या ड्रायव्हरच्या लक्षात ही गोष्ट आली नसती. तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती आज रविवार असल्यामुळे सुट्टी साजरी करणाऱ्या पर्यटक प्रवाशांची या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवाशी होते.

यापैकी कुणालाही काहीही दुखापत बाधा झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान चाळीसगाव रेल्वे स्टेशन पासून मागे मुंबईकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या उभी असल्याचेही समजले आहे.रेल्वे ची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बराच कालवधी लागणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!