Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

आता लक्ष भाजपा प्रदेशाध्यक्षपदाकडे

Share

मुंबई :  रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजप प्रदेशाध्यपदासाठी चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, बबनराव लोणीकर आणि पंकजा मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत असून, आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता महिनाभरात नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड होईल, महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर आणि ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी प्रामुख्याने आघाडीवर आहेत

सोबतच शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, आशिष शेलार यांचीही नावे चर्चेत असल्याचे समजते. आगामी विधानसभा निवडणुका पाहता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरही काही नावाची चर्चाही सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. संघटनात्मक पातळीवर भाजपमध्ये आधी वॉर्ड समिती, मंडळ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि नंतर प्रदेशाध्यक्ष अशी निवड प्रक्रिया आहे. मात्र, विधानसभा निवडणूक जवळ आल्याने आधी प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल.

वरिष्ठ पातळीवर त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून, केंद्रीय अध्यक्ष निवडीपाठोपाठ नूतन प्रदेशाध्यक्षची निवड अपेक्षित आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे अवघ्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुका असल्याने तूर्तास दानवे यांच्याकडेच जबाबदारी ठेवावी का, असाही एक मतप्रवाह असल्याचे समजते. मात्र, त्याची शक्यता कमी असल्याचेही सूत्रांनी नमूद केले.

नाथाभाऊंचाही होऊ शकतो विचार

दरम्यान प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छूक असले तरी राज्यात आ. एकनाथराव खडसे यांच्याइतका अनुभवी आणि दिग्गज ज्येष्ठ नेता पाहता त्यांची नाराजी दुर करत त्यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याबाबतचीही शक्यता पडताळून पाहिली जात आहे. मंत्रीपदावरून बाजुला झालेल्या नाथाभाऊंनी पुन्हा मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा असली तरी त्यांची अपेक्षा अजुन पूर्ण झालेली नाही. त्यांमुळे ते पक्षावर नाराज आहेत. आपली नाराजीही ते वेळोवेळी व्यक्त करत आहेत. त्यामुळे त्यांना खासदारकीचे तिकिटही देण्याचा विचार पक्षाने केला होता. परंतू त्यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे कदाचीत ऐनवेळी प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांचीही निवड होऊ शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!