Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

मराठा आरक्षणावरुन कोर्टाचा राज्य सरकारला धक्का

Share

नवीदिल्ली । वृत्तसंस्था :  वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे हा महाराष्ट्र सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे.

महाराष्ट्र सरकारने आधी जागा वाढवाव्यात आणि त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असा सल्ला सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थांना दिलासा देण्यासाठी सरकार काय पाऊल उचलणार, हे आता पाहावे लागेल.
मेडिकल पीजी कोर्सला यंदा मराठा आरक्षण लागू करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते.

अध्यादेशाविरोधातील ही याचिका सुप्रीम कोर्टाने याआधीच फेटाळली होती. यासाठी सुप्रीम कोर्टात येण्याची गरज नव्हती, असेही कोर्टाने फटकारले होते. कलम 32 अन्वये हायकोर्टात जाण्याचे आदेश दिले.मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला आव्हान देणार्‍या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली या सर्व याचिका ना याचिकाकर्त्यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान द्यावे, असा आदेश दिल्ली सुप्रीम कोर्टाने काढला, अशी माहिती राज्य सरकारचे वकील अ‍ॅडवोकेट निशांत कातनेश्वरकर यांनी दिली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!