गेंदालाल मिल परिसरात मध्यरात्री दोन गटात हाणामारी

0
जळगाव । दि.12 । प्रतिनिधी – शहरातील गेंदालाल मिल परिसरात जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली.
याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन्ही गटातील दहा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गेंदालाल मिल परिसरात शुक्रवारी रात्री 2.40 वाजेच्या सुमारास बिल्डींग क्रमांक 12 जवळ दोन गटात जुन्यावादातून शिवीगाळ करीत वाद निर्माण झाला.

दरम्यान किरकोळ वादाचे रुपांतरण हाणामारीत झाल्याने दोन्ही गटातील जमावाने हातात लाकडी काठ्या व तलवारी घेवून समोरासमोर येवून त्यांच्यात तुफान हाणामारी झाली.

दरम्यान वादाची माहिती पोलिसांना मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल होवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाणामारी करणार्‍या दोन्ही गटातील सुमारे 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील सात जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अटकेती आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्यांना दि. 14 पर्यंत पोलिस कठोडी सुनावली आहे.

दंगलीतील आरोपींची नावे
दिपक सोनवणे, कुणाल हटकर, दुर्गेश सन्यास, किरण शर्मा, सलिमखान कादरखान पटेल, समीर वजीर मोहम्मद रंगरेज, शेख सद्दाम (अव्वूचा भाऊ), हिम्मत सैंदाणे, अजिज रशिद पठाण उर्फ गुड्ड्या, किरण वैजीनाथ शर्मा अशा सात जणांना पोलीसांनी रात्री उशिरापर्यंत अटक केली.

 

LEAVE A REPLY

*