जळगावात युवकाचा संशयास्पद मृत्यू

0
जळगाव । दि.12 । प्रतिनिधी – शहरातील कांचननगरात राहणार्‍या युवकाचा प्रजापत नगर जवळील सुरत रेल्वे लाईनवर संशयास्पद मृतदेह आढळून आला. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नरेश राजेंद्र बाविस्कर (वय 18) असे मयत युवकाचे नाव असून तो कांचन नगरात आई रंजनाबाई व भाऊ उमेश यांच्या सोबत वास्तव्यास आहे.
दरम्यान नरेश आईच्या पोटात असतांनाच ज्याचे वडील वारल्याने तो काचेच्या चुकानात काम करुन आपले शिक्षण पुर्ण करीत होता.

शुक्रवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास नरेश हा आपल्या काही मित्रांसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्यानंतर चित्रपट सुटल्यानंतर रात्री 12 वाजेच्या सुमारास घरी आला.

त्यानंतर गल्लीतल्या मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी बसला होता. दरम्यान सकाळी नरेश हा घरी न आल्याने भाऊ उमेश यांनी काकांसोबत आपल्या भावाचा शोध घेण्यास सुरुवात केली.

तसेच रात्री गल्लीत नरेश सोबत बसलेल्या मित्रांना याबाबत विचारपुस केली असता. नरेश रात्री 1.30 वाजेच्या सुमारास घराकडे जात असल्याचे त्यांनी सांगीतले.

दरम्यान प्रजापत शोध घेत असतांना नरेशचा मृतदेह हा प्रजापत नगराजवळील रेल्वे खांबा क्रमांक 421/1 ते 421/33 दरम्यान मृत अवस्थेत आढळून आला.

त्यानंतर कुटुंबीयांना नरेशचा मृदहेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला असता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यावेळी कुटुंबियांना जिल्हा सामान्य रुग्णालयात मनहेलावणारा आक्रोश केला होता.

नरेश हा अत्यंत मनमिळावून स्वभावाचा असल्याने त्याच्या मित्रांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी केली होती. याप्रकरणी उपस्टेशन प्रबंधक एस.बी. सनस यांच्या खबरीवरून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रेल्वेतून पडून तरूणाचा मृत्यू
धावत्या रेल्वेतून पडून हिराशिवा कॉलनीतील एका तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान या तरुणाची ओळख पटली असून याप्रकरणी रामानंद पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, योगेश बळीराम बोरसे (वय 33 ) हे मयत तरुणाचे नाव असून तो आपल्या कुटुंबियांसोबत शहरातील हिराशिवा कॉलनीतील वास्तव्यास होते.

दरम्यान योगेश बोरसे हे मध्यरात्री मुंबई येथे कामानिमीत्त जात असतांना शिरसोली रेल्वे लाईनवर खांबा क्रं. 417/23 ते 417/25 दरम्यान रेल्वेतून पडून त्यांची मृत्यु झाला.

दरम्यान, सकाळी रेल्वे रुळावर तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा तपास करण्यास सुरुवात केली.

योगेश बोरसे यांच्या जवळ असलेल्या कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटली. दरम्यान, उपस्टेशन प्रबंधक ए. बी. सणस यांच्या खबरीवरुन रामानंद पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास संभाजी पाटील करीत आहे.

 

LEAVE A REPLY

*