जळगाव । दि.12 । प्रतिनिधी – विवेकानंद संचलित शहरातील सर्व शाळांच्या वतीने आज विवेक रन मॅरेथॉन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये सुमारे 2 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
विवेकानंद प्रतिष्ठान व रनर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यामाने आज विवेक रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन खान्देश सेंट्रल मॉल येथून करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलिस अधिक्षक बच्चनसिंग होते. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास मॅरेथॉनला सुरुवात झाली.

मॅरेथॉन स्पर्धेत इयत्ता 5 ते 7 वी व इयत्ता 8 वी ते 10 वी तर एक गट शिक्षक व शिक्षीकेतर कर्मचारी व रनर्स ग्रुपचे सदस्यांचा असे तीन गट बनविण्यात आले होते.

यावेळी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित असलेल्या सर्व शाळांमधील सुमारे 2 हजार विद्यार्थी व 250 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मॅरेथॉन मध्ये सहभागी झाले होते.

यावेळी स्पर्धकांनी 5.5 कीमी अंतर पार करुन विवेक रन पुर्ण केला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेतील विद्यार्थ्यांना खान्देश सेंट्रल मॉल मध्ये बक्षिस वितरण करुन समारोप करण्यात आला.

यावेळी रनर्स गृपचे डॉ. रवी हिरानी, विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, पुनम मानधुने, रत्नाकर गोरे, नंदकुमार जंगले यांच्यासह शिक्षक व शिक्षीकेतर कर्मचारी व रनर्स ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

असा होता मॅरेथॉनचा मार्ग
विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे आयोजीत करण्यात आलेल्या विवेक मॅरेथॉनला खान्देश सेंट्रल मॉल येथून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कोर्ट चौक, छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल, स्वातंत्र्य चौक, प्रभात चौकामार्गे रिंगरोड, ख्वॉजामिया दर्गा रोड, नुतन मराठा महाविद्यालय, कोर्ट चौकामार्गे पुन्हा खान्देश सेंट्रल मॉल मध्ये मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला.

विद्यार्थ्यांसह ज्येष्ठांचा सहभाग
विवेक मॅरेथॉन मध्ये विवेकानंद प्रतिष्ठान संचलित शाळांतधील सुमारे 2 हजार विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरीक देखील सहभागी होवून त्यांनी देखील 5 किमीची मॅरेथॉन पुर्ण केली.

 

LEAVE A REPLY

*