रंग बावरा श्रावण कार्यक्रमात चिमुकल्यांच्या श्रावण गितांनी रसिक मंत्रमुग्ध

0
जळगाव |  प्रतिनिधी  :  टप टप थेंब…, आला रे आला पाऊस आला…., अग्गो बाई ढग्गो बाई…, ये रे घना…, रिमझिम पाऊस या सुरेल श्रावण गितांचे चिमुकल्यांनी अप्रतिम सादरीकरण केल्याने उपस्थित रसिक चिंब झाले होते.
विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे आयोजित रंग बावरा श्रावण या गीतांचा कार्यक्रम कांताई सभागृहात आयोजीत करण्यात आला होता.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संगीत विभाग प्रमुख संजय पत्की, माजी शिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड, विवेकानंद प्रतिष्ठानच्या शोभा पाटील, रत्नाकर गोरे, विवेक काटदरे, पुनम मानुधने, नंदकुमार जंगले, राजेंद्र नन्नवरे यांच्यासह मुख्याध्यापक उपस्थित होते.
दरम्यान विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभुषाकरीत सुमारे २५० विद्यार्थ्यांनी श्रावणमासी हर्षमाणसी यासह भावगीते, पाऊस व बालगीतांसह मिया मल्हार रागाची बंदिश सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
यामध्ये सुयोग कॉलनीतील डॉ.अविनाश आचार्य विद्यालय, काशिनाथ पलोड स्कुल, इंग्लिश मिडीयम स्कुल, ब.गो.शानभाग विद्यालय, निवासी विभाग, श्रवण विकास मुक बधीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच सादर करण्यात आलेल्या गीतमालेतील गीते विद्यालयातील संगीत शिक्षकांनी रचली होती.
विद्यार्थ्यांना सर्व संगीत विभागातील संगीत शिक्षकांचे सहकार्य मिळाले. सूत्रसंचालन मंजुषा भिडे यांच्यासह विद्यार्थ्यांनी केले.
गाण्यांमधून जलबचत अन् एकजुटीचा संदेश
स्वरसंध्या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्टये म्हणजे केवळ व्रत वैकल्ये, सण उत्सव, मज्जाच मजा अशी संकल्पना न रहता बरसणारा श्रावण फुलविणे तसेच ही संकल्पना रुजवून ती टिकविणे प्रत्येकाचे दायित्व आहे. आपल्या चुकीमुळे आपल्याला नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते.
तसेच मुलांना लहानपणी सांगीतली जाणारी राजाची गोष्ट त्याला एक होते पाणी ही गोष्ट सांगण्याची स्थिती निर्माण होवू नये यासाठी जलबचतीचा व एकजुटीचा संदेश विद्यार्थ्यांनी गीतांमधून दिला.

LEAVE A REPLY

*