धरणगाव न.पा.तर्फे 10 कोटी रूपयांच्या विकासकामांचे लोकार्पण

पाणी वितरणासाठी 50 कोटी रुपयांचा प्रस्ताव - ना. गुलाबराव पाटील

0

धरणगाव,।प्रतिनिधी :  जलशुद्धीकरण प्रकल्प मार्गी लागला आता पाणी वितरणासाठी नविन जलवाहिन्यांसाठी 50 कोटी रूपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल केला आहे. असे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव नपाच्या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळ्यासह 10.23 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण आज ग्रामविकास राज्यमंत्री ना. दादा भुसे,ना. गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात सहकार राज्यमंत्री ना. पाटील बोलत होते.

व्यासपीठावर आ. किशोर पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, माजी मंत्री सुरेश जैन, माजी आ. आर. ओ. पाटील, माजी आ. कैलास पाटील, शिवसेना जिल्हाप्रमूख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील, मुख्याधिकारी सपना वसावा, शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावत, महानंदाताई पाटील, हभप ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, शहर प्रमूख राजेंद्र महाजन, ता. प्रमुख गजानन पाटील, राजेंद्र चव्हाण, महेश खैरनार, सुरेश चौधरी, जानकीराम पाटील,समाधान पाटील, महानगर प्रमुख, शरद तायडे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, पी.एम.पाटील, तहसिलदार सी.आर.राजपूत, बीडीओ सुभाष जाधव, सुनिल महाजन, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील,गोपाल चौधरी, सभापतीपती अनिल पाटील, पं.स. सदस्य मुकुंदराव ननवरे, शिवसेना गटनेते विनय भावे, भाजपा गटनेते कैलास माळी, यांच्यासह सर्व नगरसेवक,शिवसेना, ,युवासेना,पदाधिकारी, कार्यकर्ते आदि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री पेयजल व राष्ट्रीय पेयजल योजना, शेतकर्‍यांच्या मालाला बाजारभाव, त्याचबरोबर तरुणांना रोजगाराची संधी, सुतगिरणीस यांचा आढावा ना. पाटील यांनी घेतला.

ना. पाटील हे मतदारसंघाचे विकासपुरुष असल्याचे ग्रामविकास राज्यमंत्री ना. भुसे म्हणाले. जिल्हाधिकारी रामराजे निंबाळकर यांनी धरणगाव नगरपरिषदेच्या विकास कामांचे कौतूक केले. तसेच 18 वर्षे वय पूर्ण झालेल्या प्रत्येकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा जपून वापर करावा तसेच मतदान यंत्राबाबत पसरविण्यात येत असलेल्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. आ. किशोर पाटील, माजीमंत्री सुरेश जैन यांनीही नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या कामांचे कौतूक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

यावेळी शहराच्या विकासात योगदान देणार्‍या न.पा.चे सर्व माजी नगराध्यक्षांचा, तसेच पाणी पुरवठा योजनेसाठी सरकारला आत्मदहनाचा ईशारा देणारे माजी उपनगराध्यक्ष उमेश महाजन, जलशुध्दीकरण केंद्रासाठी दहा वर्षापासून केस वाढविणारे विजय शुक्ला,चित्रकार योगेश सुतार, ठेकेदार सास्ते पाटील, इंजिनियर अलीम शिरपूरकर, किरण पाटील, भगवान महाजन, मोहन महाजन यांचा पुष्प व सन्मानपत्र देवून विशेष सत्कार कराण्यात आला.

कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन अभिजित पाटील यांनी केले तर आभार विजय महाजन यांनी मानले. कार्यक्रमाला शहरातील व तालुक्यातील हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

विविध विकास कामे 

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान बांधण्यात आलेल्या जलशुध्दीकरण प्रकल्प- रुपये 4.77 कोटी, नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम व जुनी प्रशासकीय इमारत नुतनीकरण रुपये 2.83 कोटी, नवीन 9लक्ष लीटर क्षमतेचे जलकुंभाचे बांधकाम- रुपये 62 लाख, मार्केट कमिटी स्मशानभुमी नुतनीकरण व अद्यावतीकरण- रुपये 1.90 कोटी, सोनवद रोड स्मशानभुमी नुतनीकरण व अद्यावतीकरण- रुपये 95 लक्ष.

LEAVE A REPLY

*