ऑक्सिजन अभावी गोरखपूर रूग्णालयात आणखी एका ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

0
गोरखपूर |  उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेताना ऑक्सिजनअभावी आज सकाळी मेंदूज्वर झालेला आणखी एक ११ वर्षांचा मुलगा मृत्युमुखी पडला.

ऑक्सिजन पुरवठ्याअभावी आतापर्यंत ६३ जण दगावले आहेत.  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारनं या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशात या घटनेचे राजकीय पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. विरोधत या प्रश्नी सरकाला घेरण्याच्या तयारीत आहेत. रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळातील आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री आशुतोष टंडन रुग्णालयात भेट देण्यासाठी पोहोचले आहेत.

रुग्णालयात मागील एक महिन्यापासून ऑक्सिजन पुरवठ्याची समस्या होती. स्थानिक प्रसारमाध्यमांमध्ये यासंबंधीच्या बातम्याही येत होत्या.

पण तरीही या प्रकरणाची कल्पना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांना नव्हती. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी स्वत: या रुग्णालयाचा दौरा केला होता.

LEAVE A REPLY

*