ऐनपूर। ता.रावेर दि.11 । वार्ताहर-रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे दि.29 एप्रिल 2017 पासून येथील मातोश्री रमाई बहुउद्देशिय संस्था व ग्रामस्थ महिला यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठी महिला ग्रामसभेमध्ये निवेदन सादर केले व दि.1 मे 2017 च्या ग्रामसभेमध्ये सदर निवेदन ठेवून ते मंजुर करण्यात आले व निवेदनाच्या प्रति सर्व संबंधीत अधिकार्‍यांना पाठविण्यात आल्यानंतर दि.2 ऑगष्ट रोजी रावेर तहसिलदार यांनी दि.11 ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येईल अशी लेखी माहिती महिलांना दिली.

या अनुषंगाने दि.11 रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदानाची वेळ सकाळी 8 वाजेपून सुरू होणार होती मात्र महिलांमध्ये एवढा कमालीचा उत्साह दिसून येत होता की, यामध्ये तरूण महिलांसह वृद्ध महिलांचा सुद्धा सहभाग वाखाणण्यासारखा होता.

या मतदानासाठी 2615 एवढी महिला मतदारांची संख्या होती. त्यामध्ये 113 महिला मयत असून यामध्ये 1768 महिलांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला यात दारूबंदीच्या बाजूने 1555 (आडवी बाटली) मतदान झाले. तर उभी बाटलीला 89 मते पडली, तर 124 मतदान अवैध ठरले.

ऐनपूर गावाच्या इतिहासात ही एक ऐतिहासिक घटना असून येथील सावित्रीच्या लेकींनी हा इतिहास घडवला असून गेल्या 3 महिन्यांच्या मेहनतीला फळ आल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहात होता.

संध्याकाळी 4 वाजता मतमोजणीस सुरूवात होऊन सदर मोजणी ही सायं. 5:30 वाजेदरम्यान चालू राहिली. त्यानंतर तहसिलदार विजय ढगे यांनी सदर निवडणुकीत झालेल्या मतदानाची माहिती महिला व ग्रामस्थांना दिली.

यावेळी महिला युवावर्गाने एकच जल्लोष केला. या मतदान प्रक्रीयेसाठी राज्य उत्पादन शुल्काचे निरीक्षक ए.बी.पवार (जळगाव), दुय्यम निरीक्षक युवकाचे निरीक्षक एम.पी.पवार, सहा. निरीक्षक एच.एन.ब्राम्हणे, जवान वाय. आर.जोशी, नंदू पवार, तहसिलदार विजय ढगे, निवासी नायब तहसिलदार हर्षल पाटील, तलाठी पी.एल.पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रितम शिरतुरे, पो.पा.दिपाली तायडे यांचेसह महसुल विभागाचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.

सदर प्रक्रियेत कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी निंभोरा पोस्टेचे सपोनि प्रकाश वानखेडे यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि ज्ञानेश पाकळे, अनवर तडवी, महमुद शाह, सुनिल वंजारी, गोपनिय शाखेचे राकेश वराडे, सुधाकर पाटील, स्वप्निल पाटील, ईश्वर चव्हाण, यावल पोस्टेचे पोउनि सुनिता कोळपकर, महिला पोलीस सपना येरगुंटला यांच्यासह सहकार्‍यांनी व गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला.

सदर दारूबंदीसाठी रमाबाई बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा आशाबाई भालेराव, उपाध्यक्ष बेबाबाई तायडे, वर्षा अवसरमल, शोभाबाई अटकाळे, दुर्गाबाई वाघ, मंगला राजपूत, छाया कोळी, कमलाबाई कोळी, अलकाबाई चौधरी, शोभाबाई पाटील, मिराबाई महाजन, भारतीबाई चौधरी, अर्चना पाटील, वैशाली महाजन, साधना महाजन, मंदाबाई महाजन, सिमा पाटील, ममता पाटील, जोत्स्ना महाजन, पूजा महाजन, वैशाली पाटील, स्वाती जोशी, वंदना महाजन, छाया महाजन, सुनंदाबाई पाटील, प्रतिभा महाजन, सुनिता महाजन, आशा महाजन, विजया पाटील, रूपाली महाजन, चंपाबाई अवसरमल यांच्यांसह ग्रामस्थ महिलांनी पुढाकार घेतला.

 

 

LEAVE A REPLY

*