गाळे ताब्यात घेण्यासाठी अंतिम नोटीस

0
जळगाव । दि.11 । प्रतिनिधी-मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली. यावर औरंगाबाद खंडपीठाने दोन महिन्याच्या आत गाळे ताब्यात घ्यावे, असे आदेश दिले.
त्यानुसार मनपा प्रशासनाने गाळे ताब्यात घेण्यासाठी आज अंतिम नोटीस बजावली. त्यामुळे सेंट्रल फुले व फुले मार्केटमधील गाळेधारकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
मनपा मालकीच्या 28 व्यापारी संकुलांपैकी 18 व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत संपुष्टात आली. गाळे कराराने
देण्याबाबत महासभेने अनेक ठराव केले. परंतु गाळेधारकांनी ठरावाला विरोध करुन शासनाकडे तक्रारी केल्या.

दरम्यान, औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या चार याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी झाली होती. याप्रकरणी दि.14 जुलै रोजी गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया 15 दिवसात सुरु करुन दोन महिन्यात पूर्ण करावी, असा निकाल दिला.

या निकालाच्या अनुषंगाने 2387 गाळ्यांपैकी 655 गाळ्यांची सुनावणी होवून 81 ब चे आदेश देण्यात आले होते. उर्वरित 1645 गाळेधारकांची सुनावणी राहिली होती.

त्यामुळे दि.24 जुलै पासून ते दि.11 ऑगस्टपर्यंत सहाय्यक आयुक्त लक्ष्मीकांत कहार आणि नगररचना सहाय्यक संचालक एस.एस.फडणीस यांच्यासमोर सुनावणी झाली.

सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 81 मधील तरतुदीनुसार गाळेधारकांचे म्हणणे प्रशासनाने फेटाळले. तसेच गाळे ताब्यात घेण्यासाठी अंतिम नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

आत्महत्त्येची वेळ आणू नका !
गाळे ताब्यात घेण्यासाठी 2387 पैकी 1645 गाळेधारकांची सुनावणीची प्रक्रिया प्रलंबित होती. त्यामुळे प्रशासनाने सुनावणी घेण्याची प्रक्रिया सुरु केली.

आज अंतिम दिवशी जुने बी.जे.मार्केटमधील 68 गाळेधारकांची सुनावणी झाली. यावेळी गाळेधारकांनी ‘आमच्यावर आत्महत्येची वेळ आणू नका’ काहीतरी तोडगा काढा. अशा शब्दात गाळेधारकांनी विनवणी केली.

 

 

LEAVE A REPLY

*