जळगाव । दि.11 । प्रतिनिधी – जंगल, जमिन व पाणी ही आदिवासींची मूळ संपत्ती आहे. पूर्वी सातपुडा हा संपूर्ण हिरवागार असल्याने त्यातून आदिवासींना चांगला रोजगार देखील मिळत होता.
दरम्यान येत्या काही वर्षांत साडपुड्याला ओसाड करणार्‍यांना गावकर्‍यांनी स्वअनुषासन केले आहे. त्यामुळे आदिवासींचे कार्य क्रांतीकारी असल्याचे मत राज्याचे मुख्य सचिव प्रविण परदेशी यांनी व्यक्त केले.
विश्व आदिवासी दिनानिमीत्त लोक संघर्ष मोर्चातर्फे कांताई सभागृहात आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन उपस्थित होते. दरम्यान व्यापिठावर राज्याचे मुख्य सचिव प्रविण परदेशी, माजी मंत्री पद्माकर वळवी, अभिनेता यशपाल शर्मा, दिग्दर्शक प्रतिभा शर्मा, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. कलशेट्टी, प्रतिभा शिंदे, डॉ. विजया आहिरराव, अरुणा चौधरी, यमुनाताई, पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, आदर्श कुमार रेड्डी, मुकुंद सपकाळे आदी उपस्थित होते.

दरम्यान मान्यवरांच्या हस्ते मातीत धनुष्यबाणाचा तीर खोचून व ढोल बडवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलतांना श्री. परदेशी म्हणाले की, आदिवासी बांधवांनी माझ्याबद्दल जे उद्गार काढले आहे. त्याने मी खुप भारावून गेलो आहे. आम्हाला आमचे कार्य करण्यासाठी शासनाकडून पगार मिळत असतो. परंतू प्रतिभा शिंदे या कोणत्याही मानधन विना हे समाजपयोगी कार्यकरीत असल्याने त्यांचे कार्य हे प्रेरणादायी असल्याचे मत प्रविण परदेशी यांनी व्यक्त केले. तसेच आदिवासी बांधवांनी गेल्या 3-4 वर्षांपासून वेगळ्या दिशेने करीत असलेले कार्य पाहण्यासाठी मी आतुर असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. काही ठिकाणी आदिवासी बांधवांनी जंगल, जमिन, पाणी यासाठी बंदूक उचलली आहे. परंतू ही जमिन तुमच्याच मालकीची असून या संपत्तीचे संरक्षण करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी आदिवासी बांधवांना केले. तसेच येत्या काही वर्षात वाढत्या औद्योगीकरण व आर्थिक विकासामुळे र्‍हास होवून पर्यावरणाचा समतोल बिघडला असून जंगल वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगीतले.

अशोक जैन यांचे कार्य अशोकस्तंभासारखे – प्रतिभा शिंदे
आदिवासींच्या जंगल, जमिनीच्या हक्कासाठी ज्यावेळेला लढतो त्यावेळेस कुटुंबाला विसरु आपल्या आदिवासीच्या बांधवांच्या परिवासाठी काम करीत असतो.अशोक जैन हे आदिवासी बांधवांसाठी अशोक स्तंभासारखे सदैव आदिवासींच्या पाठीशी उभे असून त्यांना समृद्ध करण्याचे काम करीत आहे. तसेच सर्वांनी एकत्र मिळून आदिवासींना त्यांचे अधिकार देवून त्यांना समृद्ध करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

वृक्ष लावण्याचा गवगवा करु नका! – माजी मंत्री वळवी
आदिवासी बांधवांवर कितीही संकट आले तरी त्यांनी आपल्या जमिनी विकू नका. आदिवासी बांधवांना जंगलापासून दूर गेल्यास तो हिंसाचारी बनतो. तसेच आम्ही देखील जंगल वाढीसाठी लाखो वृक्ष लावले आहे. परंतू आता झाडे लावा परंतू त्याचा गवगवा करु नका असे त्यांनी सांगीतले.

आदिवासींना मुख्य प्रवाहात आणणार – अशोक जैन
गेल्यावर्षी मला आदिवासी पुरस्कर मिळाला असे सांगून आदिवासींना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी जैन इरिगेशन कार्य करीत आहे. हे कार्य करण्याची सुरुवात चांगली झाल्याने यापुढे देखील मी चांगल्या पद्धतीने कार्य करु शकतो. तसेच शासन, आदिवासी बांधव व जैन इरिगेशन यांच्या त्रिकोणी संगमामुळे व आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आदिवासींना रोजगार मिळण्यासाठी अनेक उपाययोजनांची अंमलबजावणी करुन कार्य केले जाणार आहे. त्याचप्रमाणे आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ब्ल्युप्रिंट तयार करुन त्याचे सादरीकरण करणार आहे. तसेच सदैव आदिवासी बांधवांसाठी कार्य करण्याच असल्याची ग्वाही जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी दिली.

लोकसंघर्ष मोर्चातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन
‘आमो आखा एक से’, लढेंगे जितेंगे, लोकसंघर्ष मोर्चा जिंदाबाद जिंदाबाद अश्या घोषणा देत आदिवासी बांधवांकडून लोकसंषर्घ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, शामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथून लोकसंघर्ष मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मोर्चात आदिवासी बांधवानी पारंपारीक वेशभूषा परिधान करुन नृत्याचे सादरीकरण करीत असल्याने जळगावकरांना आज आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. दरम्यान मोर्चा रेल्वेस्थानकाजवळ येवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर नेहरु चौकात महापौर नितीन लढ्ढा यांच्या हस्ते मोर्चेकर्‍यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मोर्चा गोविंदा रिक्षा स्टॉप, कोर्ट चौक, जिल्हा क्रिडा संकुल मार्गे मोर्चा कांताई सभागृहात आला. लोकसंघर्ष मोर्चात आदिवासींने पारंपारिक नृत्याचे सादरीकरण केल्याने जळगावकरांना आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले.

जंगलावर सामूहीक मालकी ठेवा
सातपुड्यातील जंगलाची मालकी आदिवासी बांधवांची आहे. परंतू जंगल ओसाड होत असल्याने याठिकाणी वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी ही शासनाची नसून ही जबाबदारी आदिवासी बांधवांची देखील आहे. शासनाने व गावकर्‍यांनी सहनियोजन करुन वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे. तसेच या जमिनीचे तुकडे न करता त्यावर संपूर्ण गावाची सामुहीक मालकी ठेवण्याचे आवाहन प्रविण परदेशी यांनी आदिवासी बांधवांना केले.

हे आहेत पुरस्कारार्थी
लोक संघर्षतर्फे देण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात राज्याचे मुख्य सचिव यांना बिरसा मुंडा पुरस्कार, माजी मंत्री पद्माकर वळवी यांना आदिवासी रत्न पुरस्कार, माजी आ. शिरीष चौधरी यांना तंट्याभिल पुरस्कार, डॉ. विजया आहिरराव व दिग्दर्शीका प्रतिभा शर्मा यांना आदिवासी मित्र पुरस्कार तर नंदुरबारचे जिल्हाधिकारी यांना क्रांतीवीर ख्वॉजा नाईक पुरस्कार देण्यात आला. दरम्यान पुरस्काराचे स्वरुप हे धनुष्यबाण, सेंद्रिय बिजाची टोकरी, कोयता, सन्मानचिन्ह, मानपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*