बालनाट्य स्पर्धेत जळगावचा बोलबाला

नाशिकचे ‘रिले’, अहमदनगरचे ‘तुझ्या जागी मी असते’ बालनाट्ये अंतिम फेरीत

0

जळगाव । प्रतिनिधी : 16 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत जळगाव आणि नाशिक केंद्रातून दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी नाशिक या संस्थेच्या ‘रिले’ या नाटकाला प्रथम तर भारदे हायस्कूल शेवगाव, अहमदनगर यांच्या ‘तुझ्या जागी मी असते तर’ या बालनाट्यात द्वितीय पारितोषिक मिळाले आहे तर जळगाव केंद्रावरील विविध बालनाट्यातील आठ कलावंतांना वैयक्तिक पारितोषिके मिळाली आहेत.

जळगाव केंद्रावर मिळालेली पारितोषिके पुढीलप्रमाणे अभिनय रौप्यपदक प्रथमेश राजपूत (वासुदेव आला रे), अभिनय प्रमामपत्रे खुशी पाटील (अभीष्टा), कृतिका मुळे (झपाटलेली चाळ), साक्षी बारी (पोपट आणि आम्ही), पंकज पाटील (मु.पो.कळमसरा), चैतन्य चंदनशे (एलियन्स द ग्रेट), प्रकाशयोजना द्वितीय मनोज पाटील (पाझर) या आठ कलावंताना पारितोषिक जाहीर झाली आहे.

दि.15 ते 25 दरम्यान भैय्यासाहेब गंधे सभागृह जळगाव आणि नाशिक येथे झालेल्या या स्पर्धेत 53 बालनाट्यांचे प्रयोग सादर करण्यात आले होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जुई बर्वे, स्वाती वेदक आणि प्रमोद काकडे यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

*