Type to search

maharashtra आरोग्यम धनसंपदा जळगाव

जलसंवर्धनाचे घेतलेले धडे आपल्या परिसरातही गिरवा : कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील

Share
जळगाव दि.25  : आयुष्याच्या पुढील वाटचालीत श्रमाचे संस्कार निश्चितच कामी येणार असून जलसंजीवनी श्रमदान शिबिरातून पाण्याची काटकसर व जलसंवर्धनाचे घेतलेले धडे आपल्या परिसरातही गिरवा असे आवाहन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरातील संभाव्य पाणी टंचाईकमी करण्यासाठी दि.21 ते 25 मे या कालावधीत विद्यापीठात विद्यापीठस्तरीय जलसंजिवनी श्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप शनिवारी कुलगुरुंच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी मंचावर   व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रा.नितीन बारी, कुलसचिव भ.भा.पाटील, प्रा.एस.टी.इंगळे, अधिसभा सदस्य दिनेश नाईक, डॉ.नितीन खर्चे उपस्थित होते.
  कुलगुरु प्रा.पाटील म्हणाले की, पाण्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत बहुमोल आहे. पाण्याचा वापर काळजीने करण्याचा शहाणपणा अंगी आला नाही तर भविष्यात सर्वत्र वाळवंट निर्माण होण्याची भीती आहे. विद्यापीठात देखील पाणी टंचाई भासू लागल्यामुळे येत्या पावसाळयातील प्रत्येक थेंब जमीनीत साठविण्याचा प्रयत्न म्हणून या जलसंजीवनी श्रमदान शिबिरातून विद्यापीठ परिसरातील तलावाचे खोलीकरण, बंधारा दुरुस्ती अशी कामे राष्ट्रीय सेवायोजनेच्या स्वयंसेवकाच्या माध्यमातून करण्यात आली.
व्य.प.सदस्य दिलीप पाटील म्हणाले की, चांगले विचार मनाशी बाळगून समाज जीवन घडविणे ही तरुणाईची जबाबदारी आहे. या शिबिरातून मिळालेल्या जलसंवर्धनाच्या   ज्ञानाचा उपयोग आपल्या परिसरासाठी करा. अशा शिबिरांमधून विद्याथ्र्यांना स्वत:च्या व्यक्तिमत्वाचा परिचय होतो. यवतमाळ येथील जलनायक डॉ.नितीन खर्चे यांनी यावेळी जलसंधारणाचे विविध उपक्रम आपल्या अनुभवातून विद्याथ्र्यांना विशद केले. जलस्त्रोत बळकटीकरण करण्यासाठी चांगल्याच जागेची गरज असते असे नाही. कोठेही ते करता येते, सांडपाण्यामुळे पाण्याचा स्त्रोत वाढविता येतो असे ते म्हणाले.
  प्रारंभी रासेयो संचालक प्रा.पंकजकुमार नन्नवरे यांनी प्रास्ताविक केले. पाच दिवसाच्या या शिबिरात तीन जिल्हयातील 150 रासेयो स्वयंसेवकांनी घाम गाळून श्रमदान केले असे प्रा.नन्नवरे म्हणाले. समारोपाचा या सत्रात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी उपस्थिताना जलप्रतिज्ञा दिली.
दीपक वाणी, प्रतिक्षा कतारे, धनश्री जोशी, अजय वाघ, प्रा.कांचन महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.दीपक सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. प्रा.जे.बी.पाटील यांनी आभार मानले. डॉ.माधव कदम, डॉ.वाल्मिक आढावे, डॉ.व्ही.बी.मांटे या जिल्हा समन्वयकांच्या नेतृत्वाखाली तीन जिल्हयातील 150 रासेयो स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!