Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

मोदींचा राजीनामा, गुरुवारी शपथ घेणार!

Share

नवीदिल्ली । वृत्तसंस्था :  लोकसभा निवडणुकीत एनडीएने दणदणीत यश मिळवल्यानंतर शुक्रवारी केंद्रीय कॅबिनेटची बैठक झाली. या बैठकीत 16 वी लोकसभा भंग करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर केला. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा मंजूर करत नवीन सरकार गठीत होईपर्यंत काम पाहण्याचे सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोदी शपथ घेण्यापूर्वी 28 मे रोजी वाराणसीत जाणार असून 29 रोजी आईचे आशीर्वाद घेण्यासाठी गुजरातमध्ये जाणार आहे. दरम्यान, लोकसभेसाठी मतदान झालेल्या सर्व 542 जागांचे अधिकृत निकाल अखेर 35 तासांच्या मॅरेथॉन मतमोजणीनंतर हाती आले आहेत. एनडीएने 350 जागा जिंकल्या असून भाजपने 303 जागा जिंकत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवले आहे. लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांवर सात टप्प्यांत मतदान झाले होते.

तामिळनाडूतील वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात आली होती. मतदान झालेल्या सर्व 542 जागांवरील मतमोजणी गुरुवारी सकाळी 8 वाजता एकाचवेळी सुरू झाली. आज दुपारपर्यंत यापैकी 541 जागांचे निकाल जाहीर झाले होते. अरुणाचल पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी मात्र लांबली. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यास तब्बल 35 तासांचा कालावधी लागला. आज सायंकाळी सातच्या सुमारास मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर येथील निकाल जाहीर करण्यात आला.

परदेश दौर्‍याचे वेळापत्रक तयार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेण्यापूर्वीच त्यांच्या परदेश दौर्‍याचे वेळापत्रक तयार झाले आहे. 14-15 जून रोजी ते शांघाय शिखर परिषदेच्या बैठकीसाठी किर्गीस्तानला जाणार आहे

त्यानंतर 28-29 जून रोजी जपानमध्ये जी-20 शिखर परिषदेत सहभागी होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!