शाडूमातीच्या गणेशमुर्ती विक्री केंद्राचा जिल्हाधिकार्‍यांनी केला शुभारंभ

0
जळगाव | प्रतिनिधी  :  गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. बाजारपेठेत प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेश मुत्यार्ंमुळे प्रदुषण मोठ्या होत असते.
त्यामुळे नागरीकांनी शाडू मातीच्या मुर्तीची स्थापना करुन पर्यावरण पुरक गणेशोत्सवासाठी जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले. जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते शाडूमातीच्या गणेशमुर्ती विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

श्री कला केंद्राच्या वतीने शिवराम गेस्ट हाऊस शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मिलींद कुलकर्णी, ऍड. सुशिल अत्रे, सार्वजनिक गणेश महामंडळाचे सचिन नारळे, दिपक जोशी उपस्थित होते.

दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते श्रीफळ फोडून पर्यावरणपूरक आणि धर्मशास्त्रानुसार सुसंगत अशा शाडूमातीच्या श्री गणेशमूर्त्यांचे वितरण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

दरम्यान जिल्हाधिकरी म्हणाले की, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांमुळे पाण्याचे प्रदुषण होत असल्याने प्रशासनावर ताण येतो, शाडू मातीच्या पर्यावरण पुरक मुर्त्या बाजारात मोठ्याप्रमाणात उपलब्ध झाल्यास आमच्यावरचा भार हलका होणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

तसेच पर्यावरण पुरक उपक्रमांना माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करुन त्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच मी लहान असतांना आम्ही मातीपासून मुर्ती बनवून त्याला लाल, निळ्या शाईचा वापर करुन त्याला रंगरंगोटी करायचो. हा उपक्रम पाहून मी भारावून असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले. दरम्यान पर्यावरणपूरक आणि धर्मशास्त्रानुसार बनवलेल्या श्री गणेशमुर्त्यांचे त्यांनी कौतुक केले.

तसेच शाडूमातीपासून तयार केल्या जाणार्‍या गणेशमुर्तींचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून असे उपक्रम प्रत्येकाने राबविले पाहीजे. तसेच त्याचा प्रसाद देखील करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगीतले. त्याचप्रमाणे पर्यावरपुक गणेशमुर्ती बनविण्याचा विषय आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून राज्य स्तरावर पोहचविणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

मंडळांनी शाडूमातीच्या मुर्तीची स्थापना करा

सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे सचिन नारळे हे आपल्या मनोगतात म्हणाले की, शहरातील सर्व गणेशमंडळांनी सार्वजनिक गणेश मंडळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्रींच्या मुर्तीची स्थापना न करता त्यांनी शाडूमातीच्या गणेश मुर्तींची स्थापना करा.

तसेच मंडळांकडून देखील यंदा शाडूमातीच्या मुर्तीची स्थापना केली जाणार असल्याचे श्री. नारळे यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

*