जळगाव जनता बँकेतर्फे १३० गुणवंतांचा गौरव

0
जळगाव |  प्रतिनिधी :  जळगाव जनता बँकेतर्फे शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळाविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात १३० गुणवंतांचा गौरव करण्यात आला. तसेच उत्कृष्ठ कार्य करणार्‍या ५ महिला बचत गट तर १ पुरुष बचत गटाचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

जनता बँकेचा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा ब्राह्मण सभेत आयोजीत करण्यात आल होता. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून युरोलॉजीस्ट डॉ. रवी महाजन, सुबोध चौधरी, लेमचंद चौधरी, विलास वाणी, जीवन जहागीरदार, संचालक हरिश्चंद्र यादव, सतीश मदाने , दीपक अट्रावलकर, सुरेश केसवाणी, सावित्री सोळूंखे, मुख कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील, महाव्यवस्थापक सुनील अग्रवाल ,विभागीय अधिकारी कपिल चौबे उपस्थित होते.

दरम्यान मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपुजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रकाश तायडे स्वागत गीत सादर केले. मान्यवरांचा परिचय बँकेच्या अधिकारी जयश्री जोशी यांनी करून दिला

. दरम्यान मार्गदर्शन करतांना डॉ. रवी महाजन म्हणाले की, विद्यार्थ्यांनी संपादन केलेले यश हे कायम ठेवावे. तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्यास वाव दिला तर विद्यार्थी हे नक्कीच चांगली प्रगती करुन उत्तुंग यश नक्कीच करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्राप्त, दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर तसेच विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविलेल्या १३० विद्यार्थ्याचा सन्मानचिन्ह, झाडाचे रोप देवून गौरव करण्यात आला. , प्रास्ताविकात हरिश्चंद्र यादव यांनी बँकेद्वारे सुरु असणा-या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी बँकेच्या शैक्षणिक कर्जाद्वारे त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम बँक करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

सुत्रसंचलन अधिकारी स्वाती भावसार यांनी केले. तर आभार शिल्पा जोशी यांनी मानले. यावेळी बँकेचे सभासद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंदेमातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

*