तहसीलदाराच्या जाचामुळे शेतकर्‍याची आत्महत्या

0

ठाणे / जमिनीच्या कामासाठी 2 वर्षांपासून एक शेतकरी मुरबाडच्या तहसीलदाराकडे फेर्‍या मारत होते.

बुधवारी सुट्टी होती तरी पुरवठा विभागातील कामासाठी तहसीलदार कार्यालय उघडे होते. पीडित शेतकर्‍याने कार्यालयात जावून इमारतीच्या टेरेसवरुन उडी घेवून आत्महत्या केली.

मृत शेतकर्याचे नाव अशोक शंकर देसले, असे आहे. तहसीलदार म्हस्के पाटील यांच्यामुळे आत्महत्या करावी लागेल,असे पीडित शेतकर्‍याने मुलांना सांगितले होते.

तहसीलदार यांनी या शेतकर्याकडे या कामासाठी 2 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोपही मृत शेतकर्‍याच्या मुलाने केला आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तहसीलदार पाटील यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

*